भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
सुमारे तीन हजार हल्ल्यांचा पुरावा
नवी दिल्ली : बांगलादेशातील ढासळती कायदा-सुव्यवस्था आणि अल्पसंख्याक हिंदू समाजावर होणारे हल्ले यावर भारत सरकारने शुक्रवारी तीव्र चिंता व्यक्त केली. बांगलादेशात दीपू चंद्र दास या हिंदू युवकाची करण्यात आलेली निर्घृण हत्या अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत, भारत सरकारने बांगलादेशातील अंतरिम सरकारला या प्रकरणी तातडीने न्याय देण्याचे आवाहन केले आहे.भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी पत्रकार परिषदेत एका धक्कादायक आकडेवारी दिली. बांगलादेशातील अंतरिम सरकारच्या कार्यकाळात हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या सुमारे तीन हजार घटनांची नोंद आहे.






