Thursday, December 25, 2025

रफी पुरस्कार माझ्यासाठी देवाचा प्रसाद

रफी पुरस्कार माझ्यासाठी देवाचा प्रसाद

जेष्ठ गायिका उत्तरा केळकर

मुंबई : महान गायक मोहम्मद रफी यांच्या नावाने मला मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी देवाचा प्रसादच आहे तो मी भक्तीभावाने स्विकारते, अशा भावना ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांनी आज येथे व्यक्त केल्या.

सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार यांच्या स्पंदन आर्ट या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यावेळचा १९ वा मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कर ज्येष्ठ संगीतकार ओ. पी. नय्यर यांना मरणोत्तर तर मोहम्मद रफी पुरस्‍कार सुप्रसिध्‍द गायिका उत्तरा केळकर यांना बुधवारी रंग शारदा येथे झालेल्या सोहळयात प्रदान करण्यात आला.

सांस्कृतीक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी हे पुरस्कार प्रदान केले. जीवन गौरव पुरस्कर एक लाख रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह अशा स्वरुपात असून ओ.पी नय्यर यांना अखेरच्या दिवसात सांभाळणाऱ्या राणी कोळी यांना पुरस्कार स्विकारला. तर ५१ हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे मोहम्मद पुरस्कराचे स्वरुप आहे.

यावेळी ॲड प्रतिमा आशिष शेलार यांच्यासह रफी यांच्या कन्या व जावई हेही उपस्थित होत्या. यावेळी त्यांच्या कुटुंबाने प्रसिध्द केल्या महोमद रफी यांच्यावरील कॅलेंडरचे प्रकाशन ही मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जीवनगाणी तर्फे फीर रफी हा कार्यक्रम सादर करण्यात आला. गायक श्रीकांत नारायण यांनी रफी यांची गाणी सादर केली तर आरजे गौरव यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

Comments
Add Comment