Thursday, December 25, 2025

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी चर्चमध्ये प्रार्थना पण केली.

कॅथेड्रल चर्च हे दिल्लीतले जुने आणि सर्वात मोठे चर्च आहे. यामुळेच पंतप्रधान मोदींच्या या चर्चेमधील उपस्थितीची सोशल मीडियात भरपूर चर्चा सुरू आहे.

चर्चमध्ये जाऊन आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया पोस्ट केली. दिल्लीतील द कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशनमध्ये ख्रिसमसच्या सकाळच्या प्रार्थनेला उपस्थित राहिलो, असा मजकूर असलेली सोशल मीडिया पोस्ट मोदींनी केली आहे.

चर्चची प्रार्थना प्रेम, शांती आणि करुणेचा शाश्वत संदेश प्रतिबिंबित करते असे मोदी म्हणाले. नाताळ अर्थात ख्रिसमसची भावना आपल्या समाजात सुसंवाद आणि बंधुता आणेल आणि वाढवेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

दिल्लीचे कॅथेड्रल चर्च त्याच्या सुंदर वास्तुकलेसाठी ओळखले जाते. दरवर्षी नाताळासाठी या चर्चमध्ये विशेष सजावट केली जाते. दिल्लीतले अनेक ख्रिश्चन (ख्रिस्ती) नागरिक प्रार्थनेसाठी तसेच नाताळ साजरा करण्यासाठी दिल्लीच्या कॅथेड्रल चर्चमध्ये येतात. यामुळेच ख्रिस्ती समाजात महत्त्वाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीच्या कॅथेड्रल चर्चला पंतप्रधान मोदींनी भेट दिली. याआधीही पंतप्रधान मोदींनी दिल्लीच्या कॅथेड्रल चर्चला भेट दिली आहे.

Comments
Add Comment