पुणे : मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी १५ मे रोजी मतदान आणि १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांसाठी प्रचाराचा धुरळा उडवण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. याआधी २४ डिसेंबर २०२५ रोजी शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी ही यादी जाहीर केली. अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांचा या यादीत समावेश आहे.
मुंबई पुणे आणि पिंपरी चिंचवडसह महत्त्वाच्या महापालिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युती-आघाडीसंदर्भात इतर पक्षांसोबत चर्चा सुरू आहेत. येत्या दोन दिवसांत आघाडीच्या घोषणेसह जागा वाटपही जाहीर करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील, नवाब मलिक, सयाजी शिंदे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार सना मलिक-शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार इद्रीस नायकवडी, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार झिशान सिद्दिकी, माजी आमदार राजेंद्र जैन, शरद पाटील, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस सूरज चव्हाण, लहू कानडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदे






