माणगाव : माणगाव तालुक्यातील मोर्बा येथे शेकापचे नेते तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती अस्लम राऊत यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे, महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी पक्षप्रवेशात अस्लम राऊत यांच्यासमवेत मोर्बा राऊत मोहल्ला, बौद्धवाडी, बोर्ले गाव, मराठा आळी, मस्जिद मोहल्ला, धनसे मोहल्ला, डोंगरोली बौद्धवाडी, रिळे, तारणे, गावातील आजी-माजी सरपंच-उपसरपंच यांनी प्रवेश केला.






