मुंबई : मुंबईतील रस्ते वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी आणि पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. मढ आणि वर्सोवा या दोन महत्त्वाच्या परिसरांना जोडणाऱ्या खाडीवरील पुलाच्या बांधकामाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले प्राथमिक सर्वेक्षण आणि जमिनीचे माती परीक्षण सुरू झाले असून, येत्या दोन महिन्यांत प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे.
सुमारे २.३९५ कोटी रुपये खर्चुन बांधल्या जाणाऱ्या या पुलाला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर प्रकल्पाच्या ठिकाणी प्राथमिक सर्वेक्षण आणि माती परीक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. हा मार्ग मढ जेट्टी रोडपासून सुरू होऊन वर्सोवा येथील फिशरीज युनिव्हर्सिटी रोडजवळ जोडला जाईल.
दहिसर-भाईंदर कोस्टल रोडला जोडणारा एक अतिरिक्त मार्ग देखील प्रस्तावित आहे. बीएमसी अधिका-यांच्या मते, वन विभागाकडून अंतिम मंजुरी आणि उच्ब न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर पूर्ण प्रमाणात काम सुरू होईल, हा प्रकल्प ३१ मार्च २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प ३१ मार्च २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे अधिकृतपणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला ६-लेन रुंद काँक्रीट, प्रवेश-नियंत्रित टोल एक्सप्रेसवे आहे. हे ९४.५ किमी अंतर कापते. मुंबई-पुणे एक नवीन द्रुतगती महामार्ग आता मार्गी लागला आहे. केंद्र सरकारने ₹१.५ लाख कोटी किमतीच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याने, प्रवास आणि गतिशीलता वाढविण्यासाठी महाराष्ट्रातील रस्ते पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व सुधारणा होणार आहेत.
मेट्रो स्थानकाची थेट समुद्रकिनाऱ्याला जोडणी
भुयारी मेट्रो ३ च्या स्थानकाची थेट समुद्रकिनाऱ्याला जोडणी मिळणार आहे. यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) ५३१ कोटी रुपये खर्चून भूमिगत पादचारी मार्ग बांधणार आहे. मेट्रो ३ ही देशातील सर्वाधिक लांबीची भुयारी मेट्रो आरे जेव्हीएलआर ते कफ परेड अशी ३३ किमी आणि २७ स्थानकांदरम्यान पूर्ण रूपात सुरू झाली आहे. याच मार्गिकेतील विज्ञान केंद्र स्थानक हे वरळी भागात असून तेथील समुद्रकिनाऱ्यापासून जवळपास दीड ते दोन किमी अंतरावर आहे. मात्र या स्थानकातून वरळी समुद्रकिनारी पोहोचायचे असल्यास पाच किमी दूरचा फेरा मारावा लागतो. तो टाळण्यासाठीच एमएमआरसीएलने भूमिगत पादचारी मार्गाचे नियोजन केले आहे. हा मार्ग एकूण १५१८ मीटर लांबीचा असेल. यासाठी ५३१ कोटी ३३ लाख ५० हजार रुपये खर्च होणार आहे.
दीड तासांचा प्रवास फक्त १० मिनिटांत
नदीच्या वेळेत, हा प्रवास एक ते दीड तासांचा असतो. प्रस्तावित पूल बांधल्यानंतर, अंतर अंदाजे ५८ ते २० किलोमीटरने कमी होईल आणि प्रवासाचा वेळ फक्त १० मिनिटे राहील, याचा पेट फायदा हवाई दल क्षेत्र आयएनएस हमला, मधू, मार्वे, मालाड आणि कांदिवली येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.






