Monday, December 22, 2025

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आराधना दांडेकर विजयी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आराधना दांडेकर विजयी

मुरुड : मुरुड नगर परिषदेची निवडणूक अपेक्षेप्रमाणे झाली. थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आराधना दांडेकर यांचा २४६ मतांनी विजय झाला. शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा कल्पना पाटील यांचा त्यांनी पराभव केला. आराधना दांडेकर यांना ४ हजार १९४ मते तर कल्पना पाटील याना ३९४९ मते पडली. २४६ मतांनी आराधना विजयी झाल्या. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक १२ नगरसेवक निवडून आले तर उबाठाचे चार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चार नगरसेवक निवडून आले.

नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना प्राप्त झाल्याने मुरुड नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस व उबाठाचे वर्चस्व निर्माण झाले.

नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुरुड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मनोज भगत यांची बहीण प्रीता चौलकर, प्रमिला माळी, तमिम ढाकम व प्रांजली मकू या विजयी झाल्या.

Comments
Add Comment