Sunday, December 21, 2025

मोहोळ नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचा विजय; नगराध्यक्षपदी सर्वात कमी वयाचा उमेदवार

मोहोळ नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचा विजय; नगराध्यक्षपदी सर्वात कमी वयाचा उमेदवार

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली असून त्या महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या नगराध्यक्ष ठरल्या आहेत. यासोबतच त्या मोहळ नगरपरिषदेच्या त्या पहिल्या महिला नगराध्यक्ष बनल्या आहेत.

विजयानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सिद्धी वस्त्रे यांनी मोहळच्या जनतेचे आभार मानले. जनतेने आपल्यावर दाखवलेला विश्वास आणि सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. प्रचाराच्या काळात आपल्यावर आणि पक्षावर अनेक टीका झाल्या, मात्र निवडणुकीच्या निकालाने या सर्व टीकांना उत्तर मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

मोहळ शहराचा सर्वांगीण विकास, नागरी सुविधा आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी रमेश बारसकर आणि उमेश दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार सिद्धी वस्त्रे यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment