कणकवली : कणकवली तालुक्यातील घोणसरी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सती मंदिर येथे बिबट असल्याचे नागरिकांनी कळवले. त्यानुसार वनविभागाच्या जलद कृषी बचाव पथकाकडून घटनास्थळी धाव घेतली. त्या बिबट्याला पिंजऱ्याच्या सहाय्याने पकडण्यात आले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. त्याची प्रकृती स्थिर होती. मादी बिबट असल्याचे निष्पन झाले.
सदर मादी बिबटला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ही घटना सकाळी 6.30 च्या सुमारास समजली. त्यानंतर आमच्या सहकाऱ्यांनी तिथे जाऊन त्या बिबटला पकडून त्याला दुपारच्या सुमारास सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडले , असे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी सांगितले.
यावेळी वनअधिकारी फारीक फिकीर, घोणसरी वनरक्षक शिवानी लोंढे , वनरक्षक अमोल पटेकर, फोंडा श्री. बाणे, जलपथक कर्मचारी श्री.तेली, मयूर राणे, व वनमजूर श्री.बागवे , श्री. राणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.






