मेक्सिकोतील संसदेत हाणामारी झाली आहे.याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जगाचे लक्ष मेक्सिकोकडे वळले आहे.एका कायद्यातील सुधारणांवर चर्चा सुरू असताना हा गोंधळ झाला.यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील महिला खासदारांमध्ये तुफान हाणामारी झाली.विरोधी पक्ष नॅशनल अॅक्शन पार्टी (PAN)च्या महिला खासदारांनी सत्ताधारी पक्षावर नियमांचे उल्लंघन केल्यचा आरोप केला.या नेत्यांना असा दावा केला की सत्ताधारी मोरेना पक्षाने बहुमताच्या जोरावर नियमांचे उल्लंघन केले आहे.यामुळे सुरुवातीला दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला आणि नंतर हाणामारी झाली.
महिला खासदारांचा व्हिडिओ व्हायरल
या घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की,दोन्ही पक्षांच्या महिला खासदार एकमेकांना हाणामारी करताते, तर काही एकमेकांना कोपराने मारत आहेत,त्याच बरोबर काही नेत्या एकमेकांचे केसही ओढताना दिसत आहेत.या घटनेनंतर,एका पॅन पक्षाने पत्रकार परिषद घेतली आणि आरोप केला की आमच्या पक्षाने शांततेत निषेध केला होता,परंतु सत्ताधारी पक्षाने बळजबरीने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे वाद झाला.नॅशनल अॅक्शन पार्टीच्या एका महिला सदस्याने घटना लज्जास्पद आणि लोकशाही नियमांविरुद्ध असल्याचे म्हटले आहे.
सभागृहात झालेल्या या गोंधळानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला.त्यामुळे सत्ताधारी पक्षाने विरोधकांशिवाय चर्चा सुरू सुरू ठेवले.मोरेना पक्षाने प्रत्युत्तर देत म्हटले की, चर्चेदरम्यान विरोधी पक्ष आपली बाजू मांडू शकला नाही,या पक्षाने बाजू मांडण्याऐवजी हिंसाचाराचा अवलंब केला.त्यामुळे हा वाद झाला