मुंबई : दिवसेंदिवस गुन्हेगारी ही वाढत चालली आहे. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. मुंबईमध्ये आता ४ नवीन पोलीस स्टेशन उभारली जाणार आहेत. चारही पोलीस स्टेशनला मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त यांच्या अखत्यारित नवीन चार पोलीस स्टेशन, दोन नवीन परिमंडळ आणि तीन सहायक पोलीस आयुक्त विभागास मंजुरी मिळाली आहे. राज्याच्या गृहखात्याने हा निर्णय घेतला आहे.
गृह खात्याकडून मिळाली मंजुरी
१) महाराष्ट्र नगर पोलीस ठाणे २) गोळीबार पोलीस ठाणे ३) मढ मार्वे पोलीस ठाणे ४) असल्फा पोलीस ठाणे
अशी एकूण चार नवीन पोलीस स्टेशन असणार आहेत. सध्याच्या पोलीस आयुक्तालयांतर्गत १३ परिमंडळ आहेत. याची पुनर्रचनाकरुन दोन नवीन परिमंडळ कार्यरत करणार आहेत. त्याचसोबत तीन नवीन सहायक पोलीस आयुक्त विभाग निर्माण होणार आहेत. या नव्या व्यवस्थेमुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळणार आहे. गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत होणार आहे.






