ठाणे : ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे बंधारा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी १०००मि. मी. व्यासाची जलवाहिनी कल्याण फाटा येथील महानगर गॅसच्या कामांमध्ये दुसऱ्या ठिकाणी पुन्हा नादुरुस्त झाली आहे. या जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी अजून चार दिवस वेळ लागण्याची शक्यता आहे. यामुळे ठाणे शहरात होणारा पाणीपुरवठा कमी झाला असून शहरांमध्ये ५० टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. १५ डिसेंबर पर्यंत प्रत्येक भागास कमी प्रमाणात पाणीपुरवठा होईल.






