नागपूर : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये जिथे शून्य ते दहा किंवा शून्य वीस विद्यार्थी आहेत अशा अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही सर्व पदे तातडीने भरावी. ग्रामीण भागात जिथे शिक्षकांची पदे रिक्त आहे तिथे पण तातडीने भरती करावी; अशी मागणी शिउबाठा आमदार संजय देरकर आणि प्रवीण स्वामी यांनी केली.
ज्यांच्याकडे पैसे आहेत ते मुलांना खासगी शाळेत शिक्षण देऊ शकतात. पण ग्रामीण भागात, खास करुन दुर्गम भागात, विरळ लोकसंख्येच्या भागात मुलं सरकारी शाळांमध्येच शिकतात. यामुळेच सर्वांगीण विचार करावा. ग्रामीण भागातील रिक्त असलेली शिक्षकांची पदे तातडीने भरावी; अशी आग्रही मागणी शिउबाठा आमदार संजय देरकर आणि प्रवीण स्वामी यांनी केली.
यवतमाळच नाही तर संपूर्ण राज्यात ग्रामीण भागात जिथे विद्यार्थी संख्याच कमी आहे आहे तिथे शिक्षकांच्या अनुपलब्धतेचा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी शिउबाठा आमदार संजय देरकर आणि प्रवीण स्वामी यांनी केली.
पंतप्रधान मोदी २०४७ पर्यंत देश विकसित करण्याचे स्वप्न बघत आहेत. पण विकास करायचा तर देशाच्या ग्रामीण भागाला मागे ठेवून चालणार नाही, तिथला शिक्षकांचा प्रश्न सोडवून शिक्षण देण्याची व्यवस्था सुरळीत करणे आवश्यक आहे, असे शिउबाठा आमदार संजय देरकर आणि प्रवीण स्वामी म्हणाले.






