जामखेड : जामखेड नगरपालिका निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सूर्यकांत मोरे नावाच्या पदाधिकाऱ्याने विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंच्या, विधान परिषदेच्या सदस्यांबाबत आणि एकंदर विधान परिषदेच्या सभागृहाच्या विरोधात काही विधाने केली आहेत. सूर्यकांत मोरे यांनी राम शिंदेंच्या बाबतीत बोलताना उडालेले बल्ब असा शब्दप्रयोग केला होता. यावर तिथे उपस्थित खासदार निलेश लंके, सुषमा अंधारेंनी आक्षेप घेतला नव्हता. पण आता सूर्यकांतच्या अडचणी वाढल्या आहेत.
सूर्यकांत मोरे, या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्याने विधानपरिषद सदस्य आणि सभापती यांच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याबद्दल प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत हक्कभंग मांडला . संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. या हक्कभंग प्रस्तावाला सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा मिळत आहे.
सर्वपक्षीयांचा पाठिंबा
शशिकांत शिंदे तर संबंधित व्यक्तीला योग्य ती समज देण्यात येईल . पण पक्षातून काढणार नाही, कारण पक्षातून आम्ही काढलं तर लगेच दुसरे पक्षात घेण्यासाठी तयार असतात. सभागृहाबद्दल किंवा या कामकाजाबद्दल कोणाला माहिती नसते त्यामुळे अशी वक्तव्य होत असतात. त्यामुळे या सभागृहाबद्दल सगळ्यांना माहिती होणं गरजेचं आहे. बाकी काय कारवाई सभागृह करणार त्याला आमचा पाठिंबा आहे.






