Thursday, December 11, 2025

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही काही भागात पाऊस आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली आहे. राज्यात थंडीची लाट असून उत्तरेकडून थंडगार वारे राज्यात येत आहेत. यामुळे पारा सातत्याने खाली जात आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील पारा १० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. मागील काही दिवसांपासून राज्यात गारठा कायम आहे. किमान तापमानात घट असल्याने गारठ्याचे प्रमाण अधिक आहे. पुढील काही दिवस राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. थंडीच्या मोठ्या लाटेचा इशारा देण्यात आला. याचबरोबर पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भात थंडीच्या लाटेचा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला. उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडी वाढत आहे.
Comments
Add Comment