Saturday, December 6, 2025

आरबीआयच्या गोट्यातून नवी बातमी - फिनो पेमेंट बँकेला स्मॉल फायनान्स बँकेचा दर्जा प्राप्त

आरबीआयच्या गोट्यातून नवी बातमी - फिनो पेमेंट बँकेला स्मॉल फायनान्स बँकेचा दर्जा प्राप्त

मोहित सोमण  आरबीआयच्या नव्या निर्देशानुसार फिनो पेमेंट बँकेला (Fino Payments Bank) स्मॉल फायनान्स बँकेचा (SFB) दर्जा मिळाला आहे. आरबीआयने आपल्या परिपत्रकात संबंधित माहिती दिली असून 'इन प्रिन्सिपल' परवानगी दिल्याचे म्हटले आहे. जी बँक आरबीआयच्या तरतूदीनुसार रहिवाशी (Resident) चालवतात व ५ वर्ष पूर्ण करतात त्यांना हा दर्जा प्रदान होतो. आरबीआयने २७ नोव्हेंबरला हा दर्जा ठरण्यासाठी नियमावली प्रकाशित केली होती. त्या निकषांवर ही अंतरिम मंजुरी देण्यात आली आहे.

आरबीआयच्या नियमावलीनुसार, निवासी /व्यावसायिक (भारतीय नागरिक), एकट्याने किंवा संयुक्तपणे, प्रत्येकी ज्यांना वरिष्ठ स्तरावर बँकिंग आणि वित्त क्षेत्रात किमान १० वर्षांचा अनुभव आहे आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि संस्था, ज्या रहिवाशांच्या मालकीच्या आणि नियंत्रित आहेत (वेळोवेळी सुधारित केलेल्या FEMA Foreign Exchange Management Act) नियम आणि नियमांमध्ये परिभाषित केल्याप्रमाणे आणि किमान पाच वर्षांच्या कालावधीसाठी त्यांचे व्यवसाय चालवण्याचा यशस्वी ट्रॅक रेकॉर्ड असलेले लघु वित्त बँका (Small Finance Bank) स्थापन करण्यासाठी प्रवर्तक म्हणून पात्र असतात.

माहितीनुसार, रहिवाशांच्या नियंत्रणाखाली असलेल्या आणि पाच वर्षांचे कामकाज पूर्ण केलेल्या विद्यमान पेमेंट बँका (PBs) देखील विविध अधिकाऱ्यांच्या सर्व कायदेशीर आणि नियामक आवश्यकतांचे पालन केल्यानंतर व त्यांनी या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले असल्यास त्या लघु वित्त बँकांमध्ये रूपांतरित होण्यास पात्र आहेत असे आरबीआयने यापूर्वी स्पष्ट केले आहे. बँकेच्या कामगिरीत सुधारणा झाल्याने ही मंजुरी मिळाली आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये बँकेला आरबीआयने ५.८८ लाखांचा दंड ठोठावला होता. एका कर्मचाऱ्याने केलेल्या घोटाळ्याप्रकरणी याची माहिती तत्काळ आरबीआयला न कळवल्याने बँकेला दंड भरावा लागला. त्यामुळे फिनो बँकेला आता आपला ३६० डिग्री पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी संधी मिळणार असून बँक "फूल सर्विस' बँक म्हणून ऑपरेशनल असणार आहे.

जून २०१७ मध्ये फिनो बँकेची स्थापना केली गेली होती तर डिसेंबर २०२३ मध्ये बँकेने स्मॉल फायनान्स बँक बनण्यासाठी आरबीआयकडे अर्ज केला होता त्यावर आज आरबीआयकडून शिक्कामोर्तब झाले आहे. या इन प्रिन्सिपल मंजूरी अंतर्गत १८ महिन्यात आवश्यक असलेले अनुपालनातील तरतूद (Regulatory Provision) बँकेला करावी लागणार आहे. आरबीआयच्या तरतूदीनुसार बँकेच्या किमान २५% शाखा या बँकिंग क्षेत्राची उपलब्धता नसलेल्या ग्रामीण भागात असाव्यात. रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीला त्यांच्या मागील कामगिरीचे प्रमाणीकरण म्हणत फिनो पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी गुप्ता म्हणाले आहेत की,'हे पाऊल तंत्रज्ञान-आधारित वित्तीय सेवा प्रदान करण्याची, डिजिटल पेमेंटचा विस्तार करण्याची आणि मजबूत अनुपालन मानके राखण्याची बँकेची क्षमता पुष्टी करते. तत्वतः मंजुरी मिळाल्यापासून एका वर्षाच्या आत फिनो आपले कर्ज देण्याचे काम सुरू करेल अशी अपेक्षा आहे.'

बँकेचे सध्याचे बाजारी भांडवल (Market Capitalisation) २६१८.४७ कोटी रुपये आहे. यंदा दुसऱ्या तिमाहीत बँकेला इयर ऑन बेसिसवर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील तुलनेत यंदा २७.४% घसरून १५.४% वर घसरला आहे. बँकेच्या उत्पन्नातही इयर ऑन इयर बेसिसवर १२.०१% घसरण झाली आहे. सरासरी ठेवीत (Average Deposits) ३६% वाढ झाल्याने ते या तिमाहीत २३०६ कोटींवर पोहोचले. बँकेच्या घोषणेनंतर गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिल्या कारणांमुळे थेट ३.१३%% उसळत ३१३ रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >