Wednesday, December 3, 2025

कोण करणार मराठी बिग बॉस ६ सीझनला होस्ट? सलमान खानने दिली माहिती

कोण करणार मराठी बिग बॉस ६ सीझनला होस्ट? सलमान खानने दिली माहिती

मुंबई : हिंदी बिग बॉस संपण्याआधीच सलमान खानने मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनला कोण होस्ट करणार याची माहिती दिली. हिंदी प्रमाणाचे मराठी प्रेक्षकांमध्ये मराठी बिग बॉस विषयी प्रचंड उत्सुकता आहे. दररोज लाखो प्रेक्षक मराठी बिग बॉस टीव्ही आणि मोबाईलवर मोठ्या प्रमाणात बघतात. या लोकप्रिय कार्यक्रमासाठी प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, त्यांच्याशी सहज संवाद साधू शकेल आणि त्यांना आपलासा वाटेल असा होस्ट निवडण्यात आला आहे. मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनचा सर्वाधिक प्रेक्षकवर्ग कोण असेल याचा विचार करुन होस्टची निवड करण्यात आली आहे.

बिग बॉस मराठीचे सुरुवातीचे सीझन निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी होस्ट केले होते. पण बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन पूर्णपणे रितेश देशमुखने होस्ट केला होता. अभिनेता रितेश देशमुखची वाढती लोकप्रियता बघूनच त्याला बिग बॉस मराठीच्या निर्मात्यांन होस्ट केले आहे. आता बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनला अभिनेता रितेश देशमुखच होस्ट करणार आहे.

हिंदी बिग बॉस सीझन १९' ७ डिसेंबरला संपणार आहे, त्यानंतर लगेचच बिग बॉस मराठी सीझन ६ ची सुरवात होणार आहे. प्रेक्षकांना सीझन ५ हा प्रचंड अडवला होता, रितेश देशमुख ह्याने वेगळ्याच धाटणीत कार्यक्रम होस्ट केला होता आणि प्रेक्षकांच्या मागणी नुसार यंदा पण रितेश देशमुखच 'बिग बॉस मराठी सीझन ६' होस्ट करणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >