वसई : राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान सुरू असताना वसईत आयकर विभागाने एका हॉटेल व्यावसायिकाच्या बंगल्यावर धाड टाकली. पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. वसईच्या पापडी येथील साई योग बंगल्यावर आयकर विभागाने धाड टाकली.
ज्या व्यक्तीच्या बंगल्यावर धाड पडली त्याचे नाव शेट्टी असल्याचे समजते. कर चुकवेगिरी प्रकरणात आयकर विभागाने धाड टाकली आहे. आयकरच्या अधिकाऱ्यांनी बंगल्यातून काही कागदपत्रे जप्त केली आहेत. हॉटेल व्यावसायिकाच्या मालमत्तेची कसून छाननी सुरू झाली आहे. या धाडीचा निवडणुकीशी काही संबंध आहे की नाही हे अद्याप समजलेले नाही. पण ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आयकर विभागाच्या कारवाईमुळे चर्चेला उधाण आले आहे.