Tuesday, December 2, 2025

बजाज हाउसिंग फायनान्सचा शेअर ९% कोसळला, गुंतवणूकदारांचा शेअरला धक्का 'या' कारणामुळे

बजाज हाउसिंग फायनान्सचा शेअर ९% कोसळला, गुंतवणूकदारांचा शेअरला धक्का 'या' कारणामुळे

मोहित सोमण: बजाज हाउसिंग फायनान्स (Bajaj Housing Finance Limited) लिमिटेड कंपनीचा शेअर आज ५२ आठवड्यातील निचांकी पातळीवर घसरला आहे. कंपनीच्या प्रवर्तकांनी (Promoter) आपला काही हिस्सा ब्लॉक डील अंतर्गत विकला आहे. कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, प्रवर्तकांनी आपला ९% भागभांडवल हिस्सा (Stake) विकला आहे. बजाज फायनान्समधून २.३५% हिस्सा म्हणजेच १८९० कोटी मूल्यांकनाचा हिस्सा विकला गेला आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली आहे. सत्राच्या सुरुवातीला कंपनीचा शेअर ९% कोसळत ९४.९० रूपयावर व्यवहार करत होता. दुपारी १२.३७ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ५.८५% घसरण झाल्याने हा शेअर ९८.३८ रूपये प्रति शेअरवर पोहोचला आहे. १ डिसेंबर २०२५ रोजी प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाचे एकूण शेअरहोल्डिंग कंपनीच्या एकूण पेड-अप इक्विटी शेअर भांडवलाच्या ७,३९१००३८४५ (८८.७०%) आहे. आज एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत कंपनीने म्हटले,' प्रवर्तक, कंपनीतील २% पर्यंत हिस्सा विकण्याची योजना आखत आहेत. कंपनीचे प्रवर्तक बजाज फायनान्स लिमिटेडकडे कंपनीच्या एकूण पेडअप भांडवलाच्या ८८.७०% असे एकूण ७३९१००३८४५ इक्विटी शेअर्स आहेत.

एकूण धारण केलेल्या शेअर भांडवलांपैकी बजाज फायनान्स कंपनीच्या इक्विटी शेअर भांडवलाच्या २% पर्यंत, एक किंवा अधिक टप्प्यांमध्ये एकूण १६६६००००० शेअर्सपेक्षा जास्त नसावेत या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपनी विकण्याचा प्रस्ताव ठेवत आहे असे कंपनीने स्पष्ट केले. ही विक्री २ डिसेंबर २०२५ पासून २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत किंवा सर्व इक्विटी शेअर्सची विक्री पूर्ण झाल्याच्या प्रत्यक्ष तारखेपर्यंत एकाच किंवा अनेक टप्प्यांमध्ये, यापैकी जे आधी असेल त्या तारखेपर्यंत सुरू होईल.

यापूर्वी गेल्या वर्षी बजाज हाउसिंग फायनान्सचा आयपीओ बाजारात दाखल झाला होता ज्यामध्ये ७० रूपयांचा प्राईज बँड निश्चित करण्यात आला होता. एकूण शेअरची कामगिरी पाहता गेल्या ५ दिवसात कंपनीचा शेअर ६.५४% घसरला असून गेल्या महिनाभरात शेअर १०.३३%, व गेल्या सहा महिन्यांत २०.४६% शेअर घसरला आहे. तर इयर टू डेट (YTD) बेसिसवर २२.१८% घसरण झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >