Monday, December 1, 2025

जगातील सर्वात मोठ्या १० शहरांची यादी समोर, संयुक्त राष्ट्राचा अहवाल

जगातील सर्वात मोठ्या १० शहरांची यादी समोर, संयुक्त राष्ट्राचा अहवाल

नवी दिल्ली  : संयुक्त राष्ट्रांच्या 'वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट्स २०२५' या ताज्या अहवालानुसार, जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानची राजधानी टोकियोला मागे टाकून इंडोनेशियाची राजधानी जकार्ता हे आता जगातील सर्वात मोठे शहर बनले आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून हे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

या अहवालानुसार, जकार्ताची लोकसंख्या तब्बल ४.१९ कोटी झाली आहे. दुसऱ्या स्थानावर बांगलादेशची राजधानी ढाका (३.६६ कोटी) आहे, तर टोकियो (३.३४ कोटी) तिसऱ्या स्थानावर घसरले आहे. विशेष म्हणजे, भारताची राजधानी नवी दिल्ली, जी यापूर्वी अनेकदा पहिल्या तीन शहरांमध्ये गणली जायची, ती आता चौथ्या स्थानावर आहे, दिल्लीतील लोकसंख्या ३.०२ कोटी नोंदवली गेली आहे.

हा बदल केवळ आकडेवारीचा नाही, तर जागतिक आर्थिक आणि लोकसंख्याशास्त्रीय बदलांचे संकेत देणारा आहे. अहवालातील प्रमुख निष्कर्ष असे आहेत: २०२५ पर्यंत जगातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे ८० टक्के लोक शहरांमध्ये राहतील. १ कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या 'मेगासिटीज'ची संख्या १९७५ मधील केवळ ८ वरून वाढून आता ३३ झाली आहे. यापैकी तब्बल १९ शहरे एकट्या आशिया खंडात आहेत. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या टॉप-१० शहरांमध्ये आशिया खंडातील ९ शहरांचा समावेश आहे. या यादीत आशियाबाहेरचे एकमेव शहर इजिप्तची राजधानी कैरो (२.३० कोटी) आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा