नवी दिल्ली : राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी आजपासून तीन दिवसांसाठी ड्राय डे असणार आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना हे तीन दिवस मद्य खरेदी करता येणार नाही. निवडणूक असलेल्या जिल्ह्यातील संबंधित नगरपरिषदा/नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी/ विदेशी किरकोळ मद्य विक्री व माडी विक्री अनुज्ञप्ती), बार अँड रेस्टॉरंट, वाईन शॉप, बिअर शॉपी १, २ डिसेंबर आणि ३ डिसेंबर २०२५ रोजी या तीन दिवशी बंद राहतील






