माथेरान : माथेरान नगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई व खासदार सुनील तटकरे यांच्या सभा एकाच दिवशी झाल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. मतदारांना आकर्षित करणारे मुद्दे नसल्याने मरगळ दिसत आहे मात्र ई-रिक्षाच्या मुद्द्यावरून प्रचाराला गती येऊ लागली आहे.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी भाषणात सांगितले ई-रिक्षा बाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची राज्य सरकार तत्काळ अंमलबजावणी करणार आहे तसेच ई-रिक्षा देखील स्वतः राज्य सरकार खरेदी करणार आहे या मध्ये घोडेवाल्यांचा व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही याची ग्वाही शंभूराज देसाई यांनी दिली. शिवराष्ट्र पॅनलच्या सभेत खासदार सुनील तटकरे यांनी देखील ई-रिक्षामुळे येथील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मोठी मदत झाली असून स्थानिक व पर्यटकांची पायपीट वाचली आहे याचा चांगला परिणाम येथील पर्यटन वाढीसाठी होणार आहे मात्र या बदलाचा परिणाम येथील आश्वचालकांवर होणार नाही याउलट त्यांचा व्यवसाय वाढेल ई-रिक्षा पॉइंटवर जाणार नाहीत त्यामुळे त्यांनी निश्चिंत राहावे असे स्पष्ट केले.
आश्वचालकांची मतदार संख्या मोठी असल्यामुळे त्यांना सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीत गोंजारत असतात, मात्र निवडणूक संपल्यावर सर्वजण घोडेवाल्यांना विसरून जात असल्याची भावना घोडेवाल्यांमधून व्यक्त केली जातं आहे. गेल्या चाळीस वर्षांत एकही नवीन तबेला आश्वचालकांना कोणी बांधून दिला नाही हे देखील कटू सत्य आहे.






