Friday, November 28, 2025

भारतातून अफगाणिस्तानला ७३ टन मदत रवाना

भारतातून अफगाणिस्तानला ७३ टन मदत रवाना
नवी दिल्ली : पाकिस्तान वारंवार अफगाणिस्तानवर हल्ले करत आहे. या पार्श्वभूमीवर भारताने अफगाणिस्तानला ७३ टन मदत विशेष विमानाने रवाना केली आहे. या मदतीत औषधांचा साठा, लसचा साठा, अनेक अत्यावश्यक पदार्थ आहेत. ही मदत अफगाणिस्तान सरकारच्या आरोग्य विभागाला सुपूर्द करण्यात आली आहे. भारताकडून मिळालेल्या मदतीसाठी अफगाणिस्तानने मोदी सरकारचे आभार मानले आहेत. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मैत्री अधिकाधिक घट्ट होत असल्याचे पाहून पाकिस्तानची झोप उडाली आहे. पाकिस्तान हल्ले करत असताना भारताकडून मिळालेली मदत हा अफगाणिस्तानसाठी मोठा आधार आहे. पण पाकिस्तानच्या सरकारमध्ये भारत करत असलेल्या मदतीमुळे प्रचंड अस्वस्थता आहे. पाकिस्तानने केलेल्या एका हल्ल्यात अफगाणिस्तानमध्ये एक महिला आणि नऊ मुलांचा मृत्यू झाला आहे. यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला आहे. पाकिस्तानच्या हल्ल्याला योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी उत्तर देऊ असे अफगाणिस्तानने जाहीर केले आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव वाढत असतानाच भारताने अफगाणिस्तानला ७३ टन मदत विमानातून पाठवली आहे. याआधी ऑक्टोबर २०२५ मध्ये भारताने अफगाणिस्तानला औषधांचा मोठा साठा, लसचा साठा आणि वीस सुसज्ज रुग्णवाहिकांचा ताफा ही मदत पाठवली होती. भारताने अफगाणी नागरिकांसाठी सहा कल्याणकारी वैद्यकीय योजना सुरू केल्या आहेत. या योजनांसाठीही अफगाणिस्तानने मोदी सरकारचे आभार मानले आहेत.
Comments
Add Comment