मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रातील बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत असलेल्या भीतीच्या वातावरणावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी संशोधक डॉ. नामदेवराव गुंजाळ यांनी राज्य सरकारकडे केली आहे. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे शेती, शिक्षण आणि आरोग्यव्यवस्था विस्कळीत झाली आहे. रात्री शेतात जाणे, विद्यार्थ्यांची हालचाल, आपत्कालीन रुग्णवाहतूक यावर गंभीर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर वाढले असून मानसिक ताणही वाढत आहे.डॉ. गुंजाळ यांनी बिबट्या समस्येवर संशोधन करून मानव-वन्यजीव सहजीवनाचा शास्त्रोक्त प्रकल्प तयार केला असून तो शासनाला मंजुरीसाठी सादर केला आहे. बिबट्यांना न मारता अथवा खच्चीकरण न करता तांत्रिक उपायांनी त्रास कमी करण्याचा हा प्रकल्प आहे