Monday, November 24, 2025

शुक्रवारी तेजस विमान कोसळले आज शेअर ९% कोसळला

शुक्रवारी तेजस विमान कोसळले आज शेअर ९% कोसळला

मोहित सोमण:शुक्रवारी 'दुबई एअर शो ' दरम्यान तेजस विमान कोसळले होते. त्यामुळे काहींनी कंपनीच्या उत्पादन क्षमतेवर व दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने गुंतवणूकदारांनी एचयुएल (Hindustan Aeronautics Limited) कंपनीच्या शेअरला नकारात्मक कौल दिला. परिणामी सुरूवातीच्या व्यवहारात कंपनीचा शेअर थेट ९% कोसळला आहे. ८ ते ९% घसरण आज सातत्याने शेअर्समध्ये झाली होती. दुपारी १२ वाजेपर्यंत कंपनीचाअ शेअर ३.५२% घसरण झाल्याने ४४३३.४० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. अर्थात सकाळी ११ नंतर शेअरने रिकव्हरी सुरु केल्याने घसरण थांबली असली तरी आज झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.

शुक्रवारी झालेल्या घटनेनंतर कंपनीने, दुबई एअर शोमध्ये हवाई प्रदर्शनादरम्यान धाडसी IAF पायलटच्या मृत्यूमुळे त्यांना खूप दुःख झाले आहे असे आपल्या निवेदनात म्हटले आहे. विंग कमांडर नमांश स्याल असे या मृत्यूमुखी पडलेल्यांचे नाव आहे. एचएएलने बनवलेले विमान २० महिन्यांत दुसऱ्यांदा अपघातात सापडले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये राजस्थानमधील जैसलमेर येथे याआधीचा अपघात झाला होता परंतु पायलट सुरक्षितपणे बाहेर पडला होता. आपल्या नेमक्या शब्दात,'दुबई एअर शोमध्ये हवाई प्रदर्शनादरम्यान धाडसी आयएएफ पायलटच्या निधनाने एचएएलला खूप दुःख झाले आहे. एचएएल शोकग्रस्त कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो' असे एचएएलने आपल्या एक्सवर पोस्टवर लिहिले आहे.

या तिमाहीत कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १०% अधिक एकत्रित नफा (Total Consolidated Net Profit) मिळाला होता तर कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर ११% वाढ झाली होती. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील १५१० कोटींच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीला १६६९ कोटींचा एकत्रित निव्वळ नफ मिळाला आहे तर कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात ५९७६.२९ कोटीवरून ६६२८.६१ कोटींवर वाढ नोंदवली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >