नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी ४९ जण रिंगणात
सुभाष म्हात्रे रोहा : रोहा नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या उबाठाच्या उमेदवार नेहा ओंकार गुरव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वनश्री समीर शेडगे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या शिल्पा धोतरे यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २० जणांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून, आता नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी सर्वपक्षीय ४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहून आपले नशीब आजमावत आहेत.
प्रभाग एक (अ)मध्ये निता हजारे (राष्ट्रवादी), पुजा ऐनकर (शिवसेना), मीना जाधव (काँग्रेस) अशी तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग एक (ब)मध्ये प्रामुख्याने शिवसेना उबाठाचे मनोज लांजेकर, राष्ट्रवादीचे प्रशांत कडू यांच्यात लढत असून, काँग्रेस पक्षाचे विकास साळवी, शिवसेनेचे महेश बोथरे व अपक्ष उमेदवार रज्जाक म्हैसकर हेही रिंगणात आहेत. प्रभाग दोन (अ)मध्ये राष्ट्रवादीच्या फरहा यासिन पानसरे विरुद्ध अपक्ष उमेदवार असमा रफिक नाडकर अशी दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग दोन (ब)मध्ये राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन हे बिनविरोध निवडून आले आहेत.
प्रभाग तीन (अ)मध्ये राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका अफरीन कादीर रोगे, शिवसेनेच्या आयेशा वसीम सावरटकर, तर अपक्ष उमेदवार फातिमा जुबेर चोगले यांच्यात चुरशीची तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग तीन (ब)मध्ये राष्ट्रवादीचे अरबाज मणेर विरुद्ध शिवसेना शहर प्रमुख मंगेश रावकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे.
प्रभाग चार (अ) मध्ये राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका स्नेह अंब्रे विरुद्ध शिवसेनेच्या नूतन शेडगे, काँग्रेसच्या राखी शेडगे, अपक्ष उमेदवार नाजिया मिरहसन रोहेकर यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. प्रभाग चार (ब)मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार अहमद दर्जी विरुद्ध शिवसेनेचे अजीज महाडकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग पाच (अ)मध्ये राष्ट्रवादीच्या अल्मास अलीम मुमेरे, शिवसेनेच्या शाहीन कागदी, काँग्रेसच्या यास्मिन पेडेकर व अपक्ष उमेदवार नीता गुंदेशा यांच्यात पंचरंगी लढत होणार आहे. प्रभाग पाच(ब)मध्ये राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष महेंद्र गुजर विरुद्ध शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष लालता कुशवाह यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग सहा (अ) मध्ये राष्ट्रवादीच्या गौरी बारटके, भाजपच्या पी. व्ही. ज्योती सनलकुमार व शिवसेच्या बेबी देशमुख अशी तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग सहा (ब) मध्ये शिवसेनेचे उबाठा रोहा शहर प्रमुख राजेश काफरे आणि महेंद्र दिवेकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग सातमध्ये (अ)मध्ये राष्ट्रवादीच्या डॉ. प्रियंका धनावडे विरुद्ध शिवसेनेच्या अनिता कोळी, प्रभाग सात (ब)मध्ये राष्ट्रवादीचे रविंद्र चाळके विरुद्ध शिवसेनेच्या धनश्री जगताप (भूतकर) यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग आठ (अ)मध्ये राष्ट्रवादीच्या संजना शिंदे विरुद्ध शिवसेनेच्या श्रद्धा पडवळ आणि प्रभाग आठ (ब)मध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक महेश कोलटकर विरुद्ध शिवसेनेचे शहर प्रमुख मंगेश रावकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग नऊ (अ)मध्ये राष्ट्रवादीच्या अश्विनी पवार विरुद्ध शिवसेनेच्या सुप्रिया जाधव, प्रभाग नऊ (ब)मध्ये देखील राष्ट्रवादीचे समीर सकपाळ विरुद्ध भाजपाचे रोशन चाफेकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग दहा (अ)मध्ये राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्ष पूर्वा मोहिते विरुद्ध शिवसेना उबाठाच्या नेहा गुरव यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग दहा (ब)मध्ये भाजपाचे शहर अध्यक्ष सुमित रिसबूड, राष्ट्रवादीचे अजित मोरे, काँग्रेसचे विनोद सावंत अशी तिरंगी लढत होणार आहे.
नगराध्यक्ष आरक्षण : ओबीसी महिला नगराध्यक्ष पद निवडणूक प्रमुख उमेदवार : वनश्री समीर शेडगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट विरुद्ध शिल्पा अशोक धोत्रे शिवसेना शिंदे गट (थेट लढत) नगरसेवक पदाचे एकूण उमेदवार : ४९ एकूण प्रभाग / नगरसेवक : १० / २० एकूण मतदार : १७,६६९






