रिपब्लिकन सेनेचा ११ वा वर्धापन दिन
ठाणे : ''२५ वर्षांपूर्वी ठाण्यात आनंद दिघे यांनी भीमशक्ती आणि शिवशक्तीची मुहूर्तमेढ रोवली होती. आमची युती ही खुर्चीसाठी नव्हे, तर सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आहे. आनंदराज आंबेडकर हे बाबासाहेबांचे रक्त आहेत आणि आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे भक्त आहोत'', असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यात केले. ठाण्यातील तलावपाळी येथील शिवाजी मैदानात रिपब्लिकन सेनेच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रिब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, युवा नेते ॲड. अमन आंबेडकर, माजी नगरसेवक रामभाऊ तायडे, आबासाहेब चासकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, संजीव बावधणकर, बाळासाहेब ओव्हाळ, सुनील वाघेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, “या ठिकाणी शिवाजी महाराजांचे मैदान आणि शेजारी आनंद दिघे यांचे स्मारक आहे. हे शक्तीस्थान आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकत्र आल्या हा योगायोग नसून इतिहास आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जगातलं सर्वोत्तम संविधान दिलं.''






