Friday, November 21, 2025

मेट्रो-११ मार्गिकेला मंजुरी

मेट्रो-११ मार्गिकेला मंजुरी

वडाळा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंतचा प्रवास होणार सुलभ

मुंबई  : मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास आणखी सोपा होण्यासाठी सरकारने मेट्रो ११ ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. मेट्रो लाइन ११ ही वडाळा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत असणार आहे. यामुळे मार्गावरील वाहतूक कोंडीही सुटणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या मेट्रो लाइन ११ साठी २३,४८७.५१ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यामध्ये मेट्रो डेपो तयार करण्याचाही समावेश असणार आहे. या प्रकल्पाला राज्य सरकारने अंतिम मान्यता दिली आहे. मेट्रो लाइन ११ ही मेट्रो ४/ ४ ए चा विस्तार आहे. ही १७.५१ किलोमीटर लांब असणार आहे. या मार्गात १३ भूमिगत व १ अॅट ग्रेड स्टेशन असणार आहे. या प्रकल्पाच्या बांधकामाची जबाबदारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने घेतली आहे.

ही मेट्रो मार्गिका वडाळा, शिवडी, फिरोजशाह मेहता रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि काळा घोडा मार्गे गेट वे ऑफ इंडियाकडे जाणार आहे. संपूर्ण मुंबईत मेट्रोचे जाळे पसरत आहे. काही वर्षात संपूर्ण मुंबईत तुम्हाला मेट्रोने प्रवास करता येणार आहे. ही नवीन मेट्रो लाइन ११ दक्षिण मुंबईसाठी गेम चेंजर ठरणार आहे. सध्या वडाळ्याहून कुलाबा आणि गेट वे ऑफ इंडियाला पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामुळे खूप वेळ वाया जातो. या नवीन मेट्रो लाइमुळे प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.

Comments
Add Comment