अभिनेत्री छाया कदम यांनी कोकणातील धामापूर गावातील सातेरी देवीच्या जत्रेला हजेरी लावत एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही त्यांनी सामान्य लोकांसारखेच जत्रेत सहभागी होत साधेपणा जपला आहे.
अभिनेत्री छाया कदम यांनी अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केलंय. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका त्या सिनेमासाठी विशेष ठरलीय. छाया कदम यांनी साध्या, सहज आणि सुंदर अभिनयातून प्रेक्षकांना वेगळेपण दाखवून दिलं. अभिनेत्री छाया कदम या सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय असतात. नुकतेच त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांचा साधेपणा पुन्हा चाहत्यांना अनुभवायला मिळाला आहे. छाया कदम या मूळच्या कोकणातील धामापूरच्या रहिवासी आहेत. त्यांनी नुकतीच त्यांच्या गावी भेट दिली. गावाकडे गेल्यावर छाया कदम यांनी सरंबळच्या सातेरी देवीच्या जत्रेत हजेरी लावली. या जत्रेच्या व्हिडीओमध्ये देवीची पालखी आणि जत्रेतील पारंपरिक लोकप्रकार पाहायला मिळताहेत.
इतक्या मोठ्या अभिनेत्री असून सुद्धा छाया कदम या एका सामान्य माणसाप्रमाणे जत्रेत सहभागी झाल्या याबद्दल अनेकांनी कमेंट करत छाया कदम यांचं कौतुक केलं आहे.






