मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट सोल्यूशन्स लिमिटेड या फिनटेक कंपनीने बुधवारी १२ मुंबई मेट्रो वन स्थानकांवर आपली नावीन्यपूर्ण स्मार्ट लॉकर प्रणाली यशस्वीरीत्या सुरू केल्याचे जाहीर केले. हा पहिलाच उपक्रम असून मुंबई मेट्रो वनच्या सहयोगाने राबविल्या जात असलेल्या या उपक्रमात मुंबईतील वाहतूक नेटवर्कमध्ये अत्याधुनिक अशी ९९६ पेक्षा जास्त डिजिटल लॉकर्स दाखल करण्यात आली आहेत. व्यापक प्रमाणात बसवलेली ही स्मार्ट लॉकर्स म्हणजे सुमारे ५ लाख प्रवाशांसाठी दैनंदिन प्रवासातील सुविधा, लास्ट-माईल लॉजिस्टिक्स आणि ई-कॉमर्स डिलिव्हरीमध्ये परिवर्तनाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
ही लॉकर्स केवळ सुरक्षित स्टोरेजची सुविधा देत नाहीत, तर शहरी गतिशीलतेच्या भविष्यातील एक महत्त्वपूर्ण दुवा ठरतात. ती कार्यक्षम ई-कॉमर्स डिलिव्हरी सक्षम बनवतात, लॉजिस्टिक्समधील फर्स्ट अँड लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी वाढवतात आणि आधुनिक शहरवासीयांसाठी डोअर-टू-डोअर लॉजिस्टिक्स अधिक कार्यक्षम आणि शाश्वत बनवतात. या सेवा आणखी वाढवण्यासाठी ऑटोपे सध्या भारतातील मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांसोबत चर्चा करत आहे. मुंबईत केलेला हा विस्तार देशभरात स्मार्ट मोबिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याच्या ऑटोपेच्या धोरणात्मक योजनेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामध्ये मुंबई मेट्रो वन सोबतच्या भागीदारीला पुढे नेले आहे. ऑटोपे पेमेंट टेक्नॉलॉजीसह वाहतूक संचालनाच्या एकीकरणाला प्रोत्साहन देण्यास आणि देशभरात सुधारित कार्यक्षमता आणि प्रवाशांच्या अनुभवासाठी डेटा अॅनालिटिक्सचा फायदा करून घेण्याबाबत वचनबद्ध आहे. ऑटोपे स्मार्ट लॉकर्स अशा प्रकारे डिझाईन करण्यात आली आहेत की, मेट्रोच्या गजबजलेल्या ईकोसिस्टममध्ये ती सहज समाविष्ट होऊ शकतील आणि प्रवासी व शहरी हितधारकांसाठी अनेक सुविधा आणि लाभ प्रदान करतील.
५ लाख प्रवाशांसाठी दैनंदिन प्रवासातील सुविधा
मुख्य वैशिष्ट्ये :
- डिजिटल अॅक्सेस : यूझर-फ्रेंडली अॅप, एसएमएस किंवा क्यूआर कोड स्कॅनिंग द्वारे प्रवासी सहजतेने ही लॉकर्स अॅक्सेस करू शकतात, ज्याचा इंटरफेस आधुनिक आणि सुरक्षित आहे.
- लॉकरच्या वेगवेगळ्या साईझ : लॉकर्स दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत : छोटा खण (सुमारे ५ किलो क्षमता) आणि मध्यम आकाराचा खण (सुमारे १० किलो क्षमता), जो पार्सल, वाणसामान किंवा व्यक्तिगत वस्तूंसाठी योग्य आहे.
- किफायतशीर आणि लवचिक वापर : छोट्या खणांसाठी ताशी २० रु आणि मध्यम आकाराच्या लॉकर्ससाठी ताशी ३० रु. शुल्क आहे, ज्यामुळे सर्व प्रवासी त्याचा उपयोग करू शकतात.
- सुरक्षित आणि निरीक्षणांतर्गत : मनःशांती देणाऱ्या या लॉकर्समध्ये २४x७ सीसीटीव्ही देखरेख आणि वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी आणि ती परत मिळवण्यासाठी ओटीपी -आधारित प्रमाणिकरणाची सुविधा आहे.
- बहुविध उपयोग : तात्पुरते स्टोरेज, सुरक्षित ई-कॉमर्स आणि कुरियर डिलिव्हरी, मिडल्-माईल लॉजिस्टिक्सचे समर्थन तसेच वाहतूक केंद्रात ब्रॅंड सॅम्पलिंग साठी आदर्श.
प्रवासी आणि शहरी ईकोसिस्टमसाठी फायदे :
- प्रवाशांची वाढीव सुविधा : मेट्रोच्या प्रवाशांना प्रवास करताना सहजपणे ऑनलाइन ऑर्डर घेणे किंवा आपल्या व्यक्तिगत गोष्टी सुरक्षित ठेवणे शक्य होते.
- शाश्वतता : मेट्रो स्थानकांवर डिलिव्हरीज एकत्र करून स्मार्ट लॉकर्स लास्ट-माईल उत्सर्जन कमी करण्यात, हरित शहरी लॉजिस्टिक्सला प्रोत्साहन देण्यात आणि शहरी वाहतूक कोंडी कमी करण्यात योगदान देतात.
- ब्रँड एंगेजमेंट : ही ईकोसिस्टम रिटेल आणि डिलिव्हरी पार्टनर्ससाठी एक दृश्यमान आणि उच्च-फुटफॉल असलेले टचपॉइंट उभे करते आणि मेट्रो ईकोसिस्टममध्ये नवीन व्यावसायिक संधी निर्माण करते.
- प्रवाशांच्या अनुभवात सुधारणा : मेट्रोच्या सेवेच्या ईकोसिस्टममध्ये भर घालते आणि अशाप्रकारे, सार्वजनिक वाहतुकीस अधिक आकर्षक, कार्यक्षम आणि नागरिकांसाठी एकीकृत पर्याय बनवते.
“आमच्या मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सेवा आणण्यासाठी ऑटोपे सोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. हा उपक्रम मुंबई मेट्रो लाइन-१ आधुनिक करण्याच्या आणि आमच्या प्रवाशांचा दैनंदिन अनुभव उन्नत करण्याच्या दिशेने उचललेले आणखी एक पाऊल आहे. प्रवाशांना, चिंतामुक्त होऊन, जास्त सामान सोबत न नेण्यासाठी सक्षम करून आम्ही मुंबईसाठी एक सोयीची, टेक-सक्षम आणि भविष्यासाठी तत्पर असलेली शहरी मोबिलिटी इकोसिस्टम उभारण्याचे आमचे व्हिजन दृढ करत आहोत.” - श्यामंतक चौधरी, मुंबई मेट्रो वनचे सीईओ
ऑटोपेमध्ये आमचे मुख्य ध्येय वाहतूक आणि आर्थिक टेक्नॉलॉजीमधील दरी भरून काढून देशभरातील शहरी प्रवाशांसाठी निर्बाध, एकीकृत अनुभव निर्माण करण्याचे आहे. या व्हिजनच्या दृष्टीने, १२ मुंबई मेट्रो वन स्थानकांवर ९९६ पेक्षा जास्त स्मार्ट लॉकर्सची उभारणी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. दिल्ली मेट्रो स्थानकांवर लॉकर्सच्या उभारणीत मिळालेले यश आणि अनुभव यांचा उपयोग करत हे प्रगत अनोख्या प्रकारचे सोल्यूशन मुंबईत आणताना आम्ही रोमांचित आहोत. - अनुराग बाजपेयी, ऑटो पे पेमेंट्स सोल्यूशन्स लि.चे संस्थापक आणि मॅनिजिंग डायरेक्टर






