आत्मज्ञान : प्राची परचुरे - वैद्य
आजच्या तंत्रज्ञानप्रधान धावपळीच्या युगात माणसाचे चित्त खूपच अस्थिर झाले आहे. विचारांची गोंधळलेली गर्दी, सततचे विचलन, डिजिटल माध्यमांचे आकर्षण यामुळे चित्ताची एकाग्रता हरवलेली दिसते. पण जीवनात यश, समाधान आणि आत्मविकासासाठी ‘चित्ताची एकाग्रता’ अत्यंत आवश्यक आहे.
चित्ताची एकाग्रता म्हणजे मनाच्या विचारधारेचं एका गोष्टीवर किंवा उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करणं. यामध्ये बाह्य विचलनांपासून स्वत:ला सावरून, अंतर्मनातून एका विचारात पूर्णपणे तल्लीन होणं अपेक्षित असतं.
- एकाग्रतेचे महत्त्व करणे आवश्यक आहे.
- अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता ही शस्त्रासारखी असते.
- साधना करणाऱ्या साधकासाठी ती अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग असते.
- व्यावसायिकांसाठी एकाग्रता म्हणजे निर्णयक्षमता आण परिणामकारकता वाढवणारा मूलभूत गुण असतो.
- कोणत्याही कलाक्षेत्रात, खेळात किंवा विज्ञानात यश मिळवण्यासाठीही एकाग्रता अत्यावश्यक आहे.
- सतत बदलणारे सोशल मीडियाचे अपडेट्स, माहितीचा अतिरेक, असंतुलित आहार आणि झोप, मानसिक ताण, उद्दिष्टाचा अभाव या गोष्टी माणसाच्या चित्ताला विचलित करतात आणि त्याचा परिणाम एकाग्रतेवर होतो. या सर्व गोष्टी मनाला अस्थिर करतात.
चित्ताची एकाग्रता वाढवण्यासाठी उपाय :
- ध्यान आणि श्वसन : दररोज काही मिनिटे ध्यान आणि श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन शांत होते.
- निश्चित दिनचर्या : नियमित वेळेवर झोप, उठणं आणि काम केल्याने मनाला स्थैर्य लाभतं.
- डिजिटल डिटॉक्स : मोबाइल, टीव्ही आणि इंटरनेटचा मर्यादित वापर करणे.
- स्वतःचे उद्दिष्ट निश्चित करणं : जेव्हा आपल्याला ठाम माहिती असतं की आपल्याला काय करायचं आहे, तेव्हा मन अधिक एकाग्र राहतं.
- वाचन आणि लेखन : सतत चांगलं वाचन आणि स्वतःचं मन मांडणं हे मनाला एकत्र करायला मदत करतं.
- योगासने आणि व्यायाम : शारीरिक स्वास्थ्यामुळे मानसिक एकाग्रता वाढते.
चित्ताची एकाग्रता ही साध्य होते, पण ती अचानक घडत नाही. सातत्य, संयम आणि आत्मनिरीक्षणाच्या सहाय्याने ती विकसित करता येते. जीवनातील कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल, तर सर्वप्रथम चित्ताला एकाग्र करावं लागेल. शांतचित्त, एकाग्र मन आणि स्पष्ट दिशा यांमुळेच माणूस आत्मसाक्षात्कारी आणि समाधानी होतो.






