Wednesday, November 19, 2025

मुंबईच्या राम मंदिर स्टेशनवर जन्मलेले बाळ झाले 'नैसर्गिकरित्या बरे'.

मुंबईच्या राम मंदिर स्टेशनवर जन्मलेले बाळ झाले 'नैसर्गिकरित्या बरे'.

मुंबई : राम मंदिर स्टेशनवर जन्मलेल्या बाळाची तब्येत जन्मानंतर काही तासांत खालावली होती. पण वेळेत उपचार मिळाल्यामुळे या बाळाची तब्येत सुधारली आहे.

मुंबईकरांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या बाळाचा जन्म १४ ऑक्टोबर २०२५ रोजी झाला. स्टेशनवर जन्मलेल्या बाळाची तब्येत जन्मानंतर खालावली होती. बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. काही दिवस व्यवस्थित उपचार केल्यानंतर आता बाळाची तब्येत सुधारली आह. सुरुवातीला बाळाला हृदयाचे छिद्र आणि चेहऱ्यातील व्यंगामुळे अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते, पण आता त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. आई-बाळ दोघेही सुखरूप आहेत.

डॉक्टरांचा प्रतिसाद आणि त्वरित उपचार

बाळ जन्मल्यानंतर त्याला त्वरित स्थानकावरच उपलब्ध असलेल्या प्राथमिक आरोग्य सुविधा येथे उपचार देण्यात आले. जन्माच्या क्षणापासूनच बाळाच्या आरोग्याविषयी चिंता होती, कारण त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि शरीरावरही काही विकार दिसत होते. म्हणून पुढील उपचारांसाठी बाळाला नायर रुग्णालयात दाखल केले गेले, तेव्हा सोनोग्राफी करण्यात आली आणि त्यांना आढळले की, हृदयाला असलेले छिद्र खूपच लहान होते आणि बाळाला त्वरित शस्त्रक्रियेची आवश्यकता देखील नव्हती. बाळाच्या आईचे असे म्हणणे होते की, ते छिद्र मोहरीच्या दाण्यापेक्षाही बारीक होते. सुदैवाने ही समस्या आता नियंत्रणात असून बाळाच्या तब्येतीत उत्तम अशी सुधारणा झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >