मक्का मदिना : मदिना जवळ उमराह यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस आणि डिझेल टँकर यांची भीषण धडक होऊन ४२ भारतीयांचा मृत्यू झाला. मृतांपैकी बहुसंख्य जण तेलंगणातील हैदराबादचे होते. हा अपघात मक्काहून मदिनाला जात असताना मुफ्रीहाटजवळ पहाटे दीड वाजता झाला.
धडकेनंतर बसला आग लागल्याने अनेक प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. अनेक जण झोपेत असल्यामुळे मोठी जीवितहानी झाली. अहवालानुसार मृतांमध्ये ११ महिला आणि १० मुलांचा समावेश असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बस पूर्णपणे जळाल्याने ओळख पटवणे कठीण झाले आहे. मोहम्मद अब्दुल शोएब नावाचा एक प्रवासी जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे.
तेलंगणा सरकारने भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आहे. राज्य सचिवालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत बाधित कुटुंबांना मदतीचे आश्वासन दिले आहे






