Saturday, November 15, 2025

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ पुरस्कार प्रदान

नोएडा : जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ प्रदान करण्यात आल्याने या पुरस्काराची मनोभूमिका अधिक उंचावली आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील नोएडा येथील राम सुतार यांच्या निवासस्थानी आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, तसेच स्थानिक खासदार डॉ. महेश शर्मा यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “देश-विदेशात भव्य शिल्पनिर्मिती करून भारताची ओळख जगभर पोहोचवणारे राम सुतार हे खऱ्या अर्थाने ऋषितुल्य आणि प्रतिभासंपन्न शिल्पकार आहेत. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सारख्या जगप्रसिद्ध भव्य शिल्पाची निर्मिती ही त्यांची अद्वितीय कामगिरी आहे. चैत्यभूमीवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी’ या पुतळ्याची निर्मिती ही देखील तेच करत आहेत. जगभरातील इतर स्मारके विविध पुतळे त्यांनी निर्माण केलेली प्रत्येक कलाकृती ही अभिमानाची बाब आहे.” ते पुढे म्हणाले, “राम सुतार यांनी शंभर वर्षांचा जीवनप्रवास पूर्ण केला असूनही त्यांची सर्जनशील ऊर्जा अद्याप अटळ आहे. त्यांच्या कार्याचा वारसा ज्येष्ठ शिल्पकार अनिल सुतार समर्थपणे पुढे नेत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >