Saturday, November 15, 2025

मच्छीमारांना आता क्यूआर कोडचे ओळखपत्र

मच्छीमारांना आता क्यूआर कोडचे ओळखपत्र

हानिकारक मासेमारीवर बंदी

नवीन नियमानुसार, एलईडीद्वारे मासे पकडणे, पेयर ट्रॉलिंग आणि बुल ट्रॉलिंगसारख्या हानिकारक मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मासेमारी करण्यासाठी कायदेशीर अंतर ठरवून राज्यासोबत मत्स्य योजना तयार केली जाणार आहे. त्यासाठी एक प्रवेश पास तयार करून तो ऑनलाइनद्वारे मोफत उपलब्ध केला जाणार आहे. मासेमारीसाठी खोलवर दूर समुद्रात जाणाऱ्या जहाजामध्ये ट्रान्सपोंडर बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी मच्छीमारांना क्यूआर कोडचे आधार दिले जाणार आहे.

सागरी सुरक्षेला अधिक प्राधान्य

मच्छीमारांना क्यूआर कोडयुक्त ओळखपत्रे दिल्यास देशाच्या सागरी सुरक्षेला मदत होऊ शकणार आहे. सागरी सीमा विस्तीर्ण असल्याने सुरक्षा यंत्रणांसमोर ओळख पटवणे आणि नियंत्रण ठेवणे आव्हानात्मक ठरते. या पार्श्वभूमीवर क्यूआर कोड प्रणाली अनेक पातळ्यांवर उपयुक्त ठरणार आहे. क्यूआर कोड ओळखपत्रांमुळे देशाच्या किनारपट्टीवरील मानवी हालचालींची नोंद राहते, अवैध मासेमारी यांसारख्या सुरक्षाविषयक धोके टाळता येणार आहेत.

Comments
Add Comment