वयाच्या ११४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नवी दिल्ली : प्रसिद्ध पर्यावरणवादी, पद्मश्री पुरस्कार विजेत्या सालूमरदा थिमक्का यांचे शुक्रवारी वयाच्या ११४ व्या वर्षी निधन झाले. थिमक्का काही दिवसांपासून आजारी होत्या. बंगळूरुमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
३० जून १९११ रोजी तुमकूरू जिल्ह्यातील गुब्बी तालुक्यात त्यांचा जन्म झाला होता. ग्रामीण कर्नाटकात अनेक दशके केलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. बंगळूरु दक्षिणमधील रामनगर जिल्ह्यातील हुलिकल आणि कुडूर दरम्यानच्या ४.५ किमीच्या पट्ट्यात त्यांनी ३८५ वडाची झाडे लावल्यामुळे त्यांना ‘सालूमरदा’ (झाडांची रांग) हे नाव मिळाले.






