Friday, November 14, 2025

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करायची आहे. ही ई केवायसी पूर्ण करण्यासाठी आता ५ दिवसांचा वेळ शिल्लक राहिला आहे. लाडकी बहीण योजना महिला व बालविकास विभागाकडून जुलै २०२४ पासून राबवली जाते. दररोज चार ते पाच लाख महिलांची ई केवायसी प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे. गुरुवारपर्यंत १ कोटी महिलांची ई केवायसी पूर्ण झाली असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर ई केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ज्या महिला एकल आहेत किंवा ज्या महिलांच्या वडिलांचे आणि पतीचे निधन झाले आहे. ज्या महिला घटस्फोटित आहेत, अशा महिलांना ई केवायसी प्रक्रिया करता येत नव्हती. अखेर महिला व बालविकास विभागाने त्याची दखल घेतली आहे. आदिती तटकरे यांनी अशा महिलांसाठी वेबसाईटमध्ये तांत्रिक बदल करणार असल्याचे सांगितले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >