Friday, November 14, 2025

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली
ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट इनोव्हेशन अरुणाचल प्रदेशच्या खडकाळ पर्वतीय प्रदेशात, १६,००० फूट उंचीवर चालण्यासाठी डिझाइन केले आहे, ज्यामुळे सैनिकांना आवश्यक वस्तू जलद पोहोचवता येतात. या मोनो रेल सिस्टीमच्या ट्रॉलीमध्ये दोन लोक एकत्र बसू शकतात. मोनोरेलच्या चाचणी दरम्यान भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात आली. ही नवीन प्रणाली भारतीय सैन्याला कामेंग हिमालयीन प्रदेशात पुरवठा पोहोचवण्यास मदत करत आहे, जिथे रस्ते किंवा इतर वाहने उपलब्ध नाहीत. पर्वतांमध्ये, अरुंद रस्ते, सैल खडक, अप्रत्याशित हवामान आणि मर्यादित ऑक्सिजनमुळे लहान अंतर लांब आणि कठीण वाटते. सैनिकांना अनेकदा विविध आवश्यक वस्तू त्यांच्या पाठीवर वाहून नेव्या लागत होत्या, त्यासाठी वेळ आणि मेहनत घ्यावी लागत होती.
Comments
Add Comment