Friday, November 14, 2025

मुंबईत मागील वर्षभरात कृष्ठरोगाचे ६२० नवीन रुग्ण

मुंबईत मागील वर्षभरात कृष्ठरोगाचे ६२० नवीन रुग्ण

येत्या १७ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत कृष्ठरोग शोध अभियान, सुमारे ४९ लाख नागरिकांची होणार तपासणी

मुंबई (खास प्रतिनिधी) : ‘राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम’ च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वर्ष २०३० पर्यत कुष्ठरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी कुष्ठरोग रुग्ण लवकरात लवकर शोधून औषधोपचाराखाली आणण्यासाठी महानगरपालिकेमार्फत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.

मागील वर्षभरात म्हणजे सन २०२४-२५ मध्ये मुंबईत एकूण ६२० नवीन कुष्ठरुग्णांचे निदान करण्यात आले. यापैकी ९६ रुग्ण मुंबईत ६ महिन्यापेक्षा कमी कालावधी साठी वास्तंव्यास होते. निदान झालेल्या सर्व कुष्ठरुग्णांवर उपचार सुरु करण्यात आल्याचा दावा महापालिका आरोग्य विभागाने केला आहे.

मुंबईत सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे १७ नोव्हेंबर २०२५ ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत ‘कुष्ठरोग शोध अभियान’ राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या माध्यमातून एकूण ९ लाख ८६ हजार घरांतील अंदाजित ४९ लाख नागरिकांची तपासणी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या अभियानादरम्यान आढळलेल्या नवीन कुष्ठरुग्णांची नोंदणी करण्यात येईल. त्यांना नजिकच्या महानगरपालिका आरोग्य केंद्रे, दवाखाने येथे मोफत उपचाराकरिता संदर्भित केले जाईल. मुंबईत कुष्ठरोग शोध तपासणी मोहीम अंतर्गत शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नागरिकांची तपासणी करावी. कुष्ठरोग प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी नागरिकांनीही अभियानामध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

कुष्ठरोगाचे असांसर्गिक कुष्ठरोग व सांसर्गिक कुष्ठरोग असे दोन प्रकार असून बहुविध औषधोपचार पद्धतीने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. कुष्ठरोगाच्या प्रकाराप्रमाणे ‘एम. डी. टी.’ चे औषध असांसर्गिक रुग्णास ६ महिने व सांसर्गिक रुग्णास १ वर्ष एवढ्या कालावधीसाठी देण्यात येते. या रोगाची लक्षणे दिसल्यास नागरिकांनी निदानासाठी जवळच्या महानगरपालिका तसेच शासकीय रुग्णालयात संपर्क साधावा. घरोघरी आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

कुष्ठरोगाची लक्षणे व उपचार पद्धती

कुष्ठरोगामध्ये रूग्णांच्या त्वचेवर फिकट / लालसर बधीर चट्टा/ चट्टे येणे,

जाड बधीर तेलकट चकाकणारी त्वचा,

कानाच्या पाळ्या जाड होणे,

तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा,

हाताची व पायाची बोटे वाकडी होणे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >