Thursday, November 13, 2025

एटीएसची इब्राहिम अबिदी याच्या मुंब्रा अन् कुर्ला येथील घरावर धाड

एटीएसची इब्राहिम अबिदी याच्या मुंब्रा अन् कुर्ला येथील घरावर धाड

नवी दिल्ली  : पुण्यातील अल कायदा प्रकरणाचे धागेदोरे आता मुंब्र्यापर्यंत पोहोचले आहेत. पुणे एटीएसने सॉफ्टवेअर इंजिनीअर जुबेर इलियास याला अटक केल्यानंतर, महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा आणि कुर्ला येथे अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईत इब्राहिम अबिदी नावाच्या शिक्षकाला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. एटीएसला संशय आहे की, 'हा मुलांना दहशतवादी कृत्यांसाठी प्रवृत्त करत होता'. अबिदीच्या घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या असून, त्याचा तपास केला जाणार आहे. ही कारवाई 'अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट' या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार करण्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या जुबेर इलियास प्रकरणाचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.

पुणे एटीएसने मुंब्रा कोसा येथे इब्राहिम आबिदी यांच्या घरी छापेमारी केली. मुंब्रा येथील घरी छापेमारी केल्यानंतर आबिदीच्या कुर्ला येथील घरावरही एटीएसने शोधमोहीम केली. मात्र लॉकडाऊननंतर अबिदी याने दुसरे लग्न केले, ते मुंब्रा येथे राहायला गेल्यानंतर या कुटुंबीयांशी फारसा संबध ठेवला नसल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. मुंब्र्यात दहशतवाद विरोधी पथकाचे धाडसत्र सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. यात शिक्षक असलेल्या इब्राहिम अबिदी यांच्या मुंब्रा आणि कुर्ला येथील घरावर एटीएसने धाड टाकली. यावेळी घरातून मोबाइल, लॅपटॉप, हार्ड डिस्क जप्त करण्यात आलीय, तर पुण्यातील जुबैर हंगरगेकर यांच्या प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून एटीएसने ही कारवाई केली आहे.

अल-कायदा इन इंडियन सबकाँटिनेंट संघटेंनेचा समर्थक असल्याचा आणि जिहादचा कथित प्रचार केल्याप्रकरणी हंगरगेकरला अटक झाली होती. मात्र इब्राहिम आबिदींच्या कुटुंबीयांकडून या आरोपांचा खंडन करत सांगितले की, इब्राहिम अबिदी मदरश्यात उर्दू शिकवत नसून साबू सिद्दीकी महाविद्यालय ३५ वर्षांपासून प्राध्यापक असल्याची कुटुंबीयांनी माहिती दिली.

डॉ. निसार-उल- हसन कुठे आहे?

दिल्ली स्फोटाच्या चौकशीत फरीदाबादच्या अल-फलाह मेडिकल कॉलेजमधील वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. निसार-उल-हसन याचे नाव समोर आले, जेव्हा एनआयएने विद्यापीठाच्या प्रयोगशाळेची आणि कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी सुरू केली. काश्मिरी वंशाचे हे डॉक्टर पूर्वी श्रीनगरच्या एसएमएचएस रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक होते. जिथे त्याला २०२३ मध्ये देशविरोधी कारवायांच्या संशयावरून काढून टाकण्यात आले होते. दिल्ली स्फोटानंतर निसार अचानक गायब झाला, ज्यामुळे जैश मॉड्यूलशी त्याचे संबंध असल्याचा संशय निर्माण झाला. तपास संस्था विद्यापीठ कॅम्पसमध्ये असतानाचे त्याचे फोन रेकॉर्ड, ईमेल आणि सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, ज्यामुळे उमर आणि मुझम्मिलसारख्या अटक केलेल्या संशयितांशी त्याचे संबंध असल्याचे सिद्ध होत आहे. बेपत्ता निसारचा सध्या देशभर शोध सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >