Thursday, November 13, 2025

दिल्ली स्फोट प्रकरणी AIU ची अल फलाह विद्यापीठावर कारवाई

दिल्ली स्फोट प्रकरणी AIU ची अल फलाह विद्यापीठावर कारवाई

नवी दिल्ली : लाल किल्ला परिसरात आय ट्वेंटी कारमधील स्फोटकांचा स्फोट झाला. या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी तपास पथकाने अनेकांना अटक केली आहे. अटक केलेल्या डॉक्टरांचा संबंध अल-फलाह युनिव्हर्सिटीशी आढळला. यानंतर असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजने उत्तर प्रदेशमधील फरिदाबादच्या अल-फलाह युनिव्हर्सिटीची मान्यता रद्द केल्याचे वृत्त आहे. विद्यापीठाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त करत ही कारवाई करण्यात आली आहे.

मान्यता रद्द झाल्यामुळे आता अल-फलाह युनिव्हर्सिटीतील अभ्यासक्रम अर्थहीन झाले आहे. करिअर करण्याच्यादृष्टीने या अभ्यासक्रमांचे महत्त्व संपले आहे.

अल-फलाह युनिव्हर्सिटी अर्थात अल-फलाह विद्यापीठ उत्तर प्रदेशमधील फरिदाबादच्या धौज गावात ७० एकर जागेवर पसरले आहे. हे खासगी विद्यापीठ आहे. एका विश्वस्त संस्थेद्वारे अल-फलाह विद्यापीठाचा कारभार चालवला जात होता. डॉ. भूपिंदर कौर आनंद या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. प्रोफेसर मोहम्मद परवेझ हे विद्यापीठाचे रजिस्ट्रार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >