Wednesday, November 12, 2025

मुंबईतील नऊ विधानसभा क्षेत्रांमध्ये महिला राज!

मुंबईतील नऊ विधानसभा क्षेत्रांमध्ये महिला राज!

पुरुषांना प्रभाग शोधण्याची आली वेळ

मुंबई (सचिन धानजी) 

मुंबईतील २२७ प्रभागांकरता आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक विधानसभा क्षेत्रांमध्ये महिला आणि पुरुष नगरसेवकांचा समतोलच बिघडून गेला आहे. त्यामुळे अनेक विधानसभा मतदार संघांमध्ये केवळ एक पुरुष नगरसेवक असून उर्वरीत सर्व प्रभागांमध्ये महिलांचेच राज्य दिसून येत आहे. यामध्ये विशेषत: दहिसर. बोरीवली,घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, भांडुप, मालाड, जोगेश्वरी, शीव कोळीवाडा, वरळी आदी विधानसभांचा समावेश आहे. यासर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये महिलांचे राज दिसून येत आहे. त्यामुळे या विधानसभांमध्ये पुरुषांना प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे.

मुंबईतील ३६ विधानसभा क्षेत्रांपैंकी ०९ विधानसभा क्षेत्रांमध्ये पुरुष आरक्षित प्रवर्गाच्या तुलनेत सर्वांधिक महिला आरक्षित प्रभागांची संख्या आहे. २२७ प्रभागांपैंकी ११४ प्रभाग हे महिलासाठी आरक्षित करण्यात आले आहे. यामध्ये अनुसूचित जाती ०८, अनुसूचित जमाती ०१, नागरिकांचा मागासवर्ग ३१ आणि सर्वसाधारण महिला ७४ आदी प्रभाग संख्येनुसार महिलांचे आरक्षण काढण्यात आले. यंदा लोकसंख्या आणि टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रभागांची आरक्षण सोडत काढण्यात आली.त्यानंतर नागरिकांचा मागासवर्ग महिला प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग आदींसाठी नव्याने चिठ्ठी द्वारे आरक्षण काढण्यात आले. यामध्ये काही विधानसभा क्षेत्रांमध्ये महिला आरक्षित प्रभागांची संख्या इतर आरक्षित प्रवर्गापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सलग दोन ते तीन प्रभाग हे सर्वसाधारण महिला तथा नागरिकांचा मागासवर्ग महिला आरक्षित झाल्याने पुरुषांना विधानसभा क्षेत्रात संधी मिळालेली नाही.

दहिसर विधानसभा क्षेत्र (सहापैंकी ५ प्रभाग महिला आरक्षित)

३ ओबीसी महिला, २ सर्वसाधारण महिला, १ खुला

बोरीवली विधानसभा क्षेत्र (सातपैंकी ६ प्रभाग महिला आरक्षित)

०४ सर्वसाधारण महिला, ०२ ओबीसी महिला, ०१ खुला

मालाड विधानसभा क्षेत्र (आठपैंकी ०४ प्रभाग महिला आरक्षित)

०४ ओबीसी महिला, ४ खुला

भांडुप विधानसभा क्षेत्र (सात पैंकी ५ प्रभाग महिला आरक्षित)

०५ सर्वसाधारण महिला, ०२ ओबीसी

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्र (आठपैंकी ७ प्रभाग महिला आरक्षित)

०५ सर्वसाधारण महिला, ०२ओबीसी महिला, ०१ एसटी

शीव कोळीवाडा विधानसभा क्षेत्र (सहापैंकी ५ प्रभाग महिला आरक्षित)

०५ सर्वसाधारण महिला, ०१ ओबीसी महिला

वरळी विधानसभा क्षेत्र (सहापैंकी ४ प्रभाग महिला आरक्षित)

३ सर्वसाधारण महिला, ०१ ओबीसी महिला ,०२ ओबीसी,

घाटकोपर पूर्व विधानसभा क्षेत्र (पाच सहापैंकी ०४ प्रभाग महिला आरक्षित)

०३ सर्वसाधारण महिला, ०१ एससी महिला, ०१खुला प्रवर्ग,

घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्र (सहापैंकी ५ प्रभाग महिला आरक्षित)

०३ सर्वसाधारण महिला, ०२ ओबीसी महिला, ०१ खुला प्रवर्ग

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >