राजधानी दिल्लीत भीषण बाॅम्बस्फोट झाला आणि तोही अशा भागात जेव्हा दिवसाच्या प्रत्येक प्रहरी हा भाग गजबजलेला असतो. लालकिल्ल्याच्या ऐतिहासिक परिसरात भीषण बाॅम्बस्फोट होऊन १४ जण ठार झाले, तर कित्येक जखमी झाले. या भागात पूर्वी दहशतवादी बाॅम्बस्फोट घडवायचे. १४ वर्षांनंतर पुन्हा त्या भीषण आणि दहशतवादी दिवसांची आठवण ताजी झाली. गर्दीने गजबजलेला हा भाग आता मातम करण्यात बदलून गेलाय. दशकभराच्या कालावधीपासून सुखाने मार्गक्रमण करणाऱ्या लोकांच्या जीवनात या स्फोटाने उथलपुथल माजवली. लोक पुन्हा एकदा अशांत पर्व अनुभवत आहेत. या स्फोटाच्या अगोदर म्हणजे १० नोव्हेंबरला फरिदाबाद येथे एका काश्मिरी डॉक्टरला अटक करून त्याच्याकडून ३६० किलो स्फोटके जप्त करण्यात आली होती. या घटनेचा सदर बाॅम्बस्फोटाशी संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. पुलवामा येथे झालेल्या स्फोटाशी या स्फोटाच्या सूत्रधाराचा संबंध असावा असा संशय आहे. एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास संस्थेने हा तपास आता हाती घेतला आहे आणि त्यातून नक्की काय ते समोर येईल. दहशतवाद्यांविरोधात आवश्यक ती पावले उचलली जात आहेत आणि यूएपीए म्हणजे पूर्वीचा टाडा कायदा दिल्ली परिसरात लागू करण्यात आला आहे. याचा अर्थ उघड आहे, तो म्हणजे दहशतवाद्यांना भारताची आगेकूच सहन होत नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा दहशतवादाचा मार्ग अवलंबला आहे. पण हा भारत मोदी यांचा आहे. त्यामुळे येथे जशाला तसेच उत्तर दिले जाते.
'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारताने हे दाखवून दिले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानने भारताला पुन्हा आपण दहशतवादी हल्ले करून जेरीस आणू शकतो हे विसरून जावे कारण आता निषेधाचे पत्रक काढून शांत बसणारे सरकार नाही. आज वेगवेगळ्या वर्तमानपत्रांत या हल्ल्यानंतर जी छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत त्यावरून हे लक्षात येते, की दहशतवाद्यांनी स्फोट घडवल्यावर सर्वत्र अफरातफरीचे आणि गोंधळाचे वातावरण होते. पण सर्वच घटनांनंतर असेच घडते. या स्फोटानंतर जी बातमी येत आहे ती जास्तच धोकादायक आहे, ती म्हणजे आयसी ८१४ च्या अपहरणांतर दहशतवाद्याची अदलाबदल झाली. त्यानंतर असलेली जैश-ई-अहमद ही संघटना या स्फोटामागे असावी का, याचा विचार सुरू आहे. लालकिल्ल्याजवळ झालेल्या बाॅम्बस्फोटामागे तीन पुरुष आणि एक महिला होत्या. ज्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारतात घुसखोरी केली होती. या स्फोटामुळे भारताला चोख उत्तर द्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या भूतान दौऱ्यावर आहेत पण त्यांनी देशवासीयांना दिलासा दिला आहे, की दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस पंतप्रधानांचे उत्तर किती चोख असते आणि दहशतवाद्यांना कसे त्यांचे सरकार त्यांच्या आकांपर्यंत जाऊन त्यांना धडा शिकवतात हे देशाने मागेच पाहिले आहे. त्यामुळे मोदी जे बोलतात ते करून दाखवतात यावर जनतेचा विश्वास आहे.
या स्फोटाची सूत्रधार मसूद अझरची बहीण शाहीन असल्याचे स्पष्ट झाले. तिचे एकच काम होते ते म्हणजे तरुणांना दहशतवादी कृत्ये करण्यास भाग पाडणे. दिल्ली धमाक्यांनंतर आता पाकिस्तानात घबराट पसरली आहे आणि हा दहशतवादी हल्ला होता. अर्थात हा सामान्य बाॅम्बस्फोट नाही. सुरुवातीच्या तपासात ही बाब समोर आली आहे, की शाहीनने घाई गडबडीत लोकांना ठार मारण्याचा कट घडवण्यात आला. पाकिस्तान या हल्ल्यामुळे पॅनिक मोडमध्ये आहे आणि नरेंद्र मोदी स्फोटाला जबाबदार असलेल्यांना सोडणार नाहीत असे सांगत आहेत. मोदी म्हणाले, की या षड्यंत्राला जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही आणि त्यांच्या या म्हणण्याला अर्थ आहे. पाकच्या मांडीवर बसून दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना मोदी यांनी 'ऑपरेशन सिंदूर'च्या वेळेस चांगला धडा शिकवला होता पण तो पुरेसा नाही. यामुळे पाक परत त्याच दहशतवादाच्या मार्गाने गेला आहे. त्याचा खामियाजा त्याला भोगावा लागणार आहे.
दिल्लीत लालकिल्ला परिसरात झालेल्या बाॅम्बस्फोटात पोलिसांना दहशतवादाचा संशय आहे. त्यामुळे अपराध्यांना कडक शासन होऊन जे निरपराध नागरिक यात बळी पडले आहेत त्यांना न्याय मिळण्याची व्यवस्था सरकारने करायला हवी. मोदीही त्याच मानसिकतेतून जात आहेत. त्यामुळे स्फोटाच्या सूत्रधारांना धडा शिकवला जाणार हे स्पष्ट आहे. या स्फोट प्रकरणी तारिक अहमद मलिक हा आणखी एक संशयित आहे आणि त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. याच हल्ल्यानंतर हाफीझ सईदचा एक व्हिडीओ समोर आला आहे, त्यात त्याने भारतावर हल्ले करण्याची धमकी दिली आहे. देशभरात आता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून विविध गुप्तचर संस्था आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा या सर्व कामाला लागल्या आहेत. पाकिस्तान स्थित लष्कर-ए-तय्यबा भारतावर मोठ्या प्रमाणात हल्ले करण्याचा कट आखत आहेत अशी ती बातमी निश्चितच भारतीयांची झोप उडवणारी आहे. कारण भारताची आर्थिक, क्रीडा आणि विज्ञान क्षेत्रातील भरारी पाकची झोप उडवणारी आहे. भारताच्या मुलींनी विश्वचषक जिंकला आणि भारताचा पुरुष संघ तर कधीचाच पुढे आहे. त्यातच भारताने चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असा लौकिक मिळवला आहे आणि भारताने इस्रोच्या मदतीने अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे पाक अस्वस्थ होणे साहजिक आहे. पण आता काँग्रेसचे लेचेपेचे सरकार नाही. मनमोहन सिंग एकदा म्हणाले होते, की या देशातील साधनसामग्रीवर पहिला हक्क अंल्पंसख्याकांचा आहे. पण मनमोहन सत्तेतून गेले आणि पाक तसेच दहशतवाद्यांचे लाडही थांबले. आता येथे अल्पसंख्याकांना जशास तसे वागून त्यांना चोख धडा शिकवणारे सरकार आहे, पहलगाम हल्ल्याच्या वेळेसच मोदी यांनी याची चुणूक दाखवली होती. पाक हल्ल्याची जबाबदारी सरळ नाकारेल आणि दहशतवादी आमचे नाहीत असे सांगेल; परंतु पाकच्या कांगाव्याला भारत आता सावरला आहे आणि पाकच्या तंगड्या त्याच्याच गळ्यात कशा अडकावच्या ते भारताला चांगले माहीत आहे, कारण हा मोदी यांचा भारत आहे.






