Wednesday, November 12, 2025

वाढदिवसादिवशी अध्यक्षाची हत्या! सांगलीत मुळशी पॅटर्नचा थरार

वाढदिवसादिवशी अध्यक्षाची हत्या! सांगलीत मुळशी पॅटर्नचा थरार

सांगली: दलित महासंघाच्या मोहिते गटाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. उत्तम मोहिते हे मुळचे सांगलीचे आहेत. सांगलीतील दलित महासंघाचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. महत्त्वाचे म्हणजे उत्तम मोहिते यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांची हत्या करण्यात आली. हा खूनाचा थरार मुळशी पॅटर्न चित्रपटातील दृश्यप्रमाणे होता.

मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी उत्तम मोहिते यांनी त्यांच्या राहत्या घराजवळ वाढदिवस साजरा करण्याचे आयोजन केले होते. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेख याने उत्तम मोहिते यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर रक्ताच्या थरोळात पडलेल्या उत्तम मोहिते यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान या घटनेवेळी हल्लेखोर शेख याला संतप्त जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये शाहरुख शेखचाही मृत्यू झाला. हा खून पूर्व वैमानस्यातून करण्यात आला की, यामागे अजून कोणते कारण होते हे अजून स्पष्ट झाले नाही आहे. या प्रकरणाबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >