मुंबई : कुर्ला (पश्चिम) परिसरातील एल.बी.एस रोड वरील शीतल टॉकीज जवळच्या हॉटेल सन लाईटमधील तळमजल्यावर भीषण आग लागली. दुपारी ३.५७ वाजता लागलेल्या या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र आगीच्या लोळातून निघालेल्या प्रचंड धुरामुळे रस्त्यावरील वाहतूक बाधित होऊन आणि नागरिकांना काही काळ त्रास झाला.
कुर्ल्यातील सनलाईट हॉटेल, सिटी हॉस्पिटलजवळ, शीतल तलाव जवळ, एलबीएस रोड येथे ही आगीची दुर्घटना घडली. आगीचे प्राथमिक कारण अद्याप समोर आलेले नाही. विनोबा भावे नगर पोलीस याबाबत चौकशी करत आहेत. ही आग लागल्यावर ती विझवण्याचे प्रयत्न तातडीने सुरू करण्यात आले. आगीमुळे धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे परिसरामध्ये नागरिकांची धावपळ होताना दिसत होती.
या आगीच्या भक्ष्यस्थानी हॉटेल आल्यामुळे हॉटेलचे नुकसान झाले आहे. मात्र त्यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असे सांगण्यात येत आहे. आहे. ही आग लेव्हल १ ची होती.
तळमजल्यावर आग लागल्यानंतर पालिकेचे पथक तसेच पोलीस यांच्यासह अग्निशमन दलाचे जवान आणि १०८ रुग्णवाहिका, संबंधित वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, एडीएफओ १, सीनियर एसओ १, एसओ-१, एफई ४, क्यूआरव्ही १, १ बीए व्हॅन, १ एचपी, ३ जेटी, १ एडब्ल्यूटीटी असा फौजफाटा त्या ठिकाणी तातडीने रवाना झाल्याची माहिती देण्यात आली.






