मोहित सोमण: केंद्र सरकारने दिलेल्या पाठिंब्यामुळे आज साखरेच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवरील ५०% असलेली कराची कॅप काढून टाकली होती. त्यामुळे आता १.५ दशलक्ष टन साखरीच्या निर्यातीचा मार्ग आता मोकळा झाला असून काकवीवरील (Molases) कर काढून टाकल्याने काकवी निर्यातही सुकर झाली.या अपडेट्समुळे साखर कंपनीच्या शेअर्समध्ये आज मोठी वाढ झाली आहे. प्रामुख्याने सकाळच्या सत्रात बलराम चिनी (५.०१%), श्री रेणुका शुगर (२.६२%), दालमिया भारत शुगर (१.१६%) मध्ये जबरदस्त वाढ झाली आहे.
अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी हा निर्णय साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इथेनॉलमध्ये कमकुवत वळवण्याचा आणि वाढत्या उत्पादन पातळीचा सामना करावा लागत असल्याने निर्यात मंजुरी आणि शुल्क काढून टाकल्याने इन्व्हेंटरीचा दबाव कमी होईल आणि गिरण्यांच्या उत्पन्नात सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे असे म्हटले. 'चालू साखर हंगामासाठीही केंद्र सरकारने १५ लाख टन साखर निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे आणि मोलॅसिसवरील ५०% निर्यात शुल्क काढून टाकण्यात आले आहे' असे जोशी म्हणाले आहेत.
इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये साखर उत्पादनात जोरदार सुधारणा होण्याचा अंदाज वर्तवला आहे. हे उत्पादन ३४३.५ लाख टन पातळीवर वाढण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या हंगामातील २९६.१ लाख टनांपेक्षा जवळपास १६% जास्त उत्पादन यंदाच्या मोसमात वाढू शकते असे संस्थेने यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.दुपारी १२.५५ वाजेपर्यंत श्री रेणुका शुगर (२.६२%), बलराज चिनी (५.८७%), त्रिवेणी इंजिनिअरिंग (१.२३%) समभागात वाढ झाली आहे.






