Monday, November 10, 2025

पुणे-बंगळूरु ग्रीनफिल्ड हायवे प्रकल्पाला रिंग रोडची जोड

पुणे-बंगळूरु ग्रीनफिल्ड हायवे प्रकल्पाला रिंग रोडची जोड

पुणे (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने पुणे-बंगळूरु ग्रीनफिल्ड हायवे प्रकल्पाला आता रिंग रोड जोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प ४२ कोटींचा असून येत्या ३ वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, द. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील प्रवास अधिक सुसाट होणार आहे. पुणे ते बंगळूरु हा ग्रीलफिल्ड प्रकल्प महामार्ग विकसित करण्यासाठी बांधण्यात येत आहे.

प्रकल्पाचे फायदे:

पुणे बंगळूरु प्रवासाचा वेळ लक्षणीय प्रमाणात कमी होणार

वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवता येईल.

उद्योगक्षेत्रात नवतरुणांना उपजीविकेच्या संधी प्राप्त होतील.

महामार्गावरून प्रतितास १२० किलोमीटर वेगाने वाहने जाऊ शकणार आहेत.

पुणे आणि बंगळूरु शहरांजवळ पाच किलोमीटर लांबीची तातडीचे इमर्जन्सी एअरस्ट्रिप (हेलीपॅड) तयार करण्याचे नियोजन.

दृष्टिक्षेपात प्रकल्प :

संपूर्ण मार्ग ६९९ किमी लांबीचा असून महाराष्ट्रातील लांबी २०६ किमीची आहे.

सहापदरी रस्ता. एनएचएआय या प्रकल्पावर काम करत असून क्रेंद सरकारने मान्यता दिली आहे.

महामार्गालगत गावांमध्ये लॉजिस्टिक पार्क, औद्योगिक हब किंवा नवीन औद्योगिक वसाहती, स्वतंत्र सॅटेलाइट शहरे विकसित करण्यात येईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा