महेश देशपांडे
अलीकडेच समोर आलेल्या जीएसटी संकलनाच्या आकड्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीची चुणूक दाखवली. त्यामुळे गेल्या महिन्यात जीएसटी संकलन किती झाले, जीएसटी महसूल अंदाजापेक्षा जास्त मिळाला की कमी, त्याचा मागील काळाशी संबंध जोडला असता काय चित्र दिसते, याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, नेमकी आकडेवारी समोर आल्याने सणासुदीमुळे वाहनविक्रीमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
सरत्या काळामध्ये देशाने जोमदार खरेदीयात्रा अनुभवली. दिवाळीच्या खरेदीने अनेकांना चकीत केले. त्या पाठोपाठ आलेल्या जीएसटी संकलनाच्या आकड्यांनीही देशाच्या आर्थिक स्थितीची चुणूक दाखवली. अर्थनगरीमध्ये याच अनुषंगाने उठलेले तरंग अनुभवायला मिळत आहेत. त्यामुळे जीएसटी संकलन किती झाले, जीएसटी महसूल अंदाजापेक्षा जास्त मिळाला की कमी, त्याचा मागील काळाशी संबंध जोडला असता काय चित्र दिसते, याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, नेमकी आकडेवारी समोर आल्याने सणासुदीमुळे वाहनविक्रीमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
उत्सवकाळातील खरेदीमुळे ऑक्टोबरमध्ये एकूण जीएसटी संकलन ४.६ टक्क्यांनी वाढून सुमारे एक लाख ९६ हजार कोटी झाले. स्वयंपाकघरातील वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल्ससह ३७५ वस्तूंवर नवीन वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दर २२ सप्टेंबरपासून लागू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीपूर्वी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जीएसटी दर कपातीची घोषणा केल्यानंतर ग्राहकांनी जीएसटी दर कपातीच्या अंमलबजावणीची वाट पाहत आपले खरेदीचे निर्णय पुढे ढकलले. सरकारी आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये एकूण जीएसटी संकलन एक लाख ९६ हजार कोटी रुपये होते. ते ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या एक लाख ८७ हजार कोटी रुपयांच्या संकलनापेक्षा ४.६ टक्के जास्त आहे. या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये करसंकलन अनुक्रमे एक लाख ८६ हजार कोटी रुपये आणि एक लाख ८९ हजार कोटी इतके म्हणजेच किंचित कमी होते. ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलनात झालेली ४.६ टक्के वार्षिक वाढ मागील महिन्यात झालेल्या सरासरी नऊ टक्क्यांच्या वाढीपेक्षा कमी आहे. स्थानिक विक्रीचा निर्देशक असलेला एकूण देशांतर्गत महसूल ऑक्टोबरमध्ये दोन टक्क्यांनी वाढून एक लाख ४५ हजार कोटी रुपये झाला. दुसरीकडे, आयात कर अंदाजे १३ टक्क्यांनी
दरम्यान, या अानुषंगाने काही भाकितेही समोर येत आहेत. आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये जीएसटी महसूल सरकारच्या बजेट अंदाजांपेक्षा जास्त असेल. अहवालानुसार, राज्यांमध्ये करदरांच्या पुनर्रचनेनंतरही एकूण जीएसटी महसूल मजबूत राहील. हे भारतीय अर्थव्यवस्थेतील करप्रणालीची स्थिरता दर्शवते. ‘एसबीआय रिसर्च’ अहवालात म्हटले आहे, की आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये जीएसटी संकलन बजेट अंदाजांपेक्षा जास्त असेल. अहवालात ‘जीएसटी कौन्सिल’ने जाहीर केलेल्या विकासदर अंदाजांवर बेतून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे, की कर दरांच्या अलीकडील पुनर्रचनेनंतरही बहुतेक राज्यांना आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये निव्वळ फायदा दिसेल. सप्टेंबर २०२५ मध्ये लागू केलेल्या जीएसटी दर पुनर्रचनेअंतर्गत आता शून्य टक्के, पाच टक्के, १८ टक्के आणि ४० टक्के अशी कररचना अस्तित्त्वात आहे. या बदलामुळे महाराष्ट्राला अंदाजे सहा टक्के फायदा होईल तर कर्नाटकला १०.७ टक्क्यांपर्यंत वाढ दिसेल. अहवालात पुढे म्हटले आहे की दर पुनर्रचनेनंतर एकूण राज्ये निव्वळ नफा मिळवतील. ‘एसबीआय रिसर्च’ने जुलै २०१८ आणि ऑक्टोबर २०१९ च्या जीएसटी दर सुधारणांचा अनुभव आपल्या विश्लेषणात समाविष्ट केला आहे.
अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार ऑक्टोबर २०२५ मध्ये जीएसटी संकलन ४.६ टक्क्यांनी वाढून एक लाख ९५ हजार कोटी रुपये झाले. जे गेल्या वर्षी याच महिन्यात एक लाख ८७ हजार कोटी रुपये होते. एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान एकूण करसंकलन नऊ टक्क्यांनी वाढून १३.८९ लाख कोटी रुपये झाले आहे. या कालावधीत केंद्रीय कर संकलन, राज्य कर संकलन आणि एकात्मिक कर संकलनात वाढ झाली आहे, तर उपकर संकलनात किंचित घट झाली आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार हीच पद्धत कायम राहिल्यास येत्या काही महिन्यांमध्ये सरकारी महसूल आणखी मजबूत होऊ शकतो.
अन्य दखलपात्र आर्थिक घडामोडींमध्ये सणासुदीच्या काळात ऑटोमोबाइल क्षेत्राने वेग घेतल्याचे पाहायला मिळाले. ग्राहकांची वाढती मागणी आणि सकारात्मक बाजारभावामुळे महिंद्रा अँड महिंद्रा (एम अॅण्ड एम), टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकी यासारख्या आघाडीच्या कंपन्यांच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या मागणीत वाढ झाल्याने उद्योगात नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये ऑटो क्षेत्राच्या कामगिरीबाबतच्या अपेक्षा वाढल्या आहेत. महिंद्रा अॅण्ड महिंद्राची एकूण वाहन विक्री २६ टक्क्यांनी वाढून एक लाख वीस हजार १४२ युनिट्सवर पोहोचली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा (एम अँड एम)ने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्ये कंपनीच्या देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री ३१ टक्क्यांनी वाढून ७१,६२४ युनिट्सवर पोहोचली आहे. देशांतर्गत बाजारात व्यावसायिक वाहनांची विक्री १४ टक्क्यांनी वाढून ३१,७४१ युनिट्सवर पोहोचली आहे. दुसरीकडे, टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम)ने ऑक्टोबरमध्ये एकूण विक्रीमध्ये ३९ टक्के वाढ नोंदवली. ती ४२,८९२ युनिट्सवर पोहोचली आहे.
कृषी आणि बांधकाम उपकरणे बनवणाऱ्या एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेडने ऑक्टोबर २०२५ मध्ये गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत एकूण ट्रॅक्टरविक्रीमध्ये ३.८ टक्के वाढ नोंदवली असून ती १८ हजार ७९८ युनिट्सवर पोहोचली आहे. ‘स्कोडा ऑटो इंडिया’ने ऑक्टोबर २०२५ मध्ये ८,२५२ युनिट्सची विक्री नोंदवली. ती आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री आहे. ‘ह्युंदाई मोटर इंडिया’ची विक्री ६९ हजार ८९४ युनिट्सवर पोहोचली आहे. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडची एकूण विक्री सात टक्क्यांनी वाढून २२०,८९४ युनिट्सवर पोहोचली आहे. व्यावसायिक वाहनांसह त्यांची एकूण देशांतर्गत विक्री एक लाख ८० हजार ६७५ युनिट्सच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे.
‘टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड’ची एकूण विक्री २६.६ टक्क्यांनी वाढून ६१ हजार २९५ युनिट्सवर पोहोचली आहे. ‘टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स’ने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात विक्रमी ६१ हजार २९५ वाहने विकली गेली. यामध्ये ‘एसयूव्ही’चा सर्वाधिक वाटा होता. ४७ हजारपेक्षा जास्त युनिट्स विकली गेली. ऑक्टोबरमध्ये किया इंडियाची विक्री ३० टक्क्यांनी वाढून २९ हजार ५५६ युनिट्सवर पोहोचली. ‘किआ इंडिया’ची विक्री ३० टक्क्यांनी वाढून २९,५५६ युनिट्सवर पोहोचली. ही भारतीय बाजारात प्रवेश केल्यापासून कंपनीची सर्वोत्तम मासिक विक्री आहे. ‘किआ इंडिया’ने सांगितले, की वाहनांच्या विक्रीमध्ये सोनेटचा सर्वाधिक वाटा होता. या गाडीच्या १२ हजार ७४५ युनिट्सची विक्री झाली. ‘टीव्हीएस मोटर कंपनी’नुसार त्यांची विक्री ११ टक्क्यांनी वाढून पाच लाख ४३ हजार ५५७ युनिट्सवर पोहोचली आहे. गेल्या महिन्यात टीव्हीएसची एकूण दुचाकी विक्री दहा टक्क्यांनी वाढून पाच लाख २५ हजार १५० युनिट्सवर पोहोचली. कंपनीने पुढे म्हटले आहे की देशांतर्गत दुचाकी विक्री आठ टक्क्यांनी वाढून चार लाख २१ हजार ६३१ युनिट्सवर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्






