नंदुरबार : शाळेच्या मुलांना घेऊन चाललेली बस अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई घाट परिसरात शे-दिडशे फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि २० ते ३० विद्यार्थी जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
मोलगी गावातील विद्यार्थी बसने अक्कलकुवाच्या दिशेने निघाले होते. देवगोई घाटातील आमलिबारी परिसरातून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. अपघातात बसचे नुकसान झाले. एक विद्यार्थी दरीत कोसळलेल्या बसमध्ये दबल्यामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. बसमधील अनेक विद्यार्थी जखमी आहेत. स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्यात गुंतले आहेत.





