Sunday, November 9, 2025

एसटीच्या धडकेने ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी

एसटीच्या धडकेने ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी

पुणे : स्वारगेट बस डेपोमध्ये (स्वारगेट बस स्थानक) एक विचित्र अपघात झाला. चालक एसटी मागे घेत होता. ही रिव्हर्सची प्रक्रिया सुरू असताना बसच्या मार्गात ज्येष्ठ नागरिक आला. बसचे एक चाक ज्येष्ठ नागरिकाच्या पायावरुन गेले. यामुळे ज्येष्ठ नागरिक जखमी झाला. जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. पण वय ६५ असल्यामुळे डॉक्टरांनी देखरेखीत उपचार सुरू ठेवले आहेत.

बसचे चाक पायावरुन गेल्यामुळे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव शिवाजी कानडे असे असून त्यांचे वय ६५ वर्षे आहे. ते फलटण-मुंबई एसटी बसने प्रवास करत होते. बस स्वारगेट येथे उभी असताना ते पाय मोकळे करण्यासाठी खाली उतरले होते पण चालकाच्या हलगर्जीपणामुळे जखमी झाले.

लवकरच शिवाजी कानडे यांच्या पायावर ससूनचे डॉक्टर शस्त्रक्रिया करणार आहेत. पायाच्या दुखापतीचे स्वरुप गंभीर असल्यामुळे शस्त्रक्रिया शक्य तितक्या लवकर केली जाईल.

Comments
Add Comment